पुणे : राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला आहे. यातच शिंदे गट आणि राष्ट्रवादी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे. यातच शिंदे गटातील आमदार भरतशेठ गोगावले यांनी मंत्री अदिती तटकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गोगावले यांच्यावर सडकून टिका केलीय.
हेही वाचा…रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे-राष्ट्रवादीत वादाची पहिली ठिणगी, राजकारण तापणार
शिंदे सरकारच्या पुढील मंत्रिमंडळात भरतशेठ गोगावले मंत्रिपदासाठी आतुर आहेत. यातच त्यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री देखील हवं आहे. परंतु राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री अदिती तटकरे यांनी पालकमंत्री पद देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी करीत आहेत. यातच अदिती तटकरे यांनी पालकमंत्री पद म्हणून चांगलं काम केलं असलं तरी त्यापेक्षा मी चांगलं काम करून दाखवेन. शेवटी महिला आणि पुरूषांमध्ये काही फरक आहे की नाही. असं गोगावले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“कुठंही दिसला तरी तुझ्या तोंडाला काळं फासणार,” नितेश राणेंच्या विरोधात तृतीय पंथीय समाज आक्रमक
दरम्यान, आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विधानाने केवळ आदिती तटकरे यांचाच अपमान झाला नाही तर राज्यातील ६ कोटीपेक्षा अधिका महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे. स्त्री-पुरूष असा भेदभाव करणाऱ्या अधोगती प्रवृत्तींचा जाहीर निषेध, पवार साहेबांनी महिला धोरणाच्या माध्यमातून महिलांना विविध क्षेत्रात समान स्थान आणि समान संधी दिली. याचा नेहमीच अभिमान वाटतो, पण समानतेची शिकवण देणाऱ्या, संताची भूमी असलेल्या आणि सुसंस्कृत राजकीय परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात महिला लोकप्रतिनिधींविषयी असं बेताल वक्तव्य करणं कितपत योग्य आहे. असा सवाल देखील रोहित पवार यांनी केला आहे.
यातच आदिती तटकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेध म्हणून राष्ट्रवादी भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गोगावले यांच्याविरोधात आंदोलन केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ .त्यावेळी मी मृत्यूची वाट पाहत होते…,” निलम गोऱ्हे हुंदका देत व्यक्त झाल्या
हेही वाचा…“आपल्या घाशातील घास खाणारी राष्ट्रवादी सरकारमध्ये आली”, बच्चू कडूंची पुन्हा नाराजी
हेही वाचा…मंत्रीमंडळ विस्तार : पुण्यातून आमदार मिसाळ यांना ‘कॉल’ अन् पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांची ‘विकेट’?
हेही वाचा…“इतक्या कलंकित गोष्टी करून सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपासून दूर”
हेही वाचा…पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रीपद, आजच होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ?