पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार आजच होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काल रात्री उशिरापर्यंत मुंबईत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली आहे. त्यामुळे आज सायंकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून पुणे जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळण्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…“शिंदेंच्या मंत्र्यांना डच्चू, नव्या आमदारांना संधी, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ठरला”
पुणे जिल्ह्यात भाजपचे आमदार राहुल कुल, महेश लांडगे आणि माधुरी मिसाळ यांची नावं चर्चेत होती. परंतु भाजपकडून महिलांना संधी देण्यात येणार असून पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उच्च व तंज्ञशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यानंतर माधुरी मिसाळ यांच्या रूपाने पुण्याला आणखी एक मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा मंत्रालयीन गोटात सुरू आहे.
हेही वाचा…काॅंग्रेसची लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरली..! दिल्लीत काॅंग्रेसच्या बैठकीत मोठा निर्णय
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर त्याआधी एकनाथ शिंदे यांच्यासह १० तर भाजपचे १० असे एकूण २९ मंत्री सध्या सरकारमध्ये आहेत. त्यामुळे अजून १४ मंत्री पद रिक्त आहेत. या मंत्रिपदावर आता कुणाची वर्णी लागणार ते पाहणं महत्वाचं लागणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे-राष्ट्रवादीत वादाची पहिली ठिणगी, राजकारण तापणार
हेही वाचा…“कुठंही दिसला तरी तुझ्या तोंडाला काळं फासणार,” नितेश राणेंच्या विरोधात तृतीय पंथीय समाज आक्रमक
हेही वाचा…“एसटी कर्मचाऱ्यांच्या १२३ आत्महत्यांना शरद पवार जबाबदार”, गुणरत्ने सदावर्तेंची शरद पवारांवर टिका
हेही वाचा…“..म्हणून माझ्या रक्ताने तु्म्हाला पत्र लिहीत आहे,” तरूणांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
हेही वाचा…तृतीय पंथीय समाज नितेश राणेंना कोर्टात खेचणार, ठाकरेंवरील टिका नितेश राणेंना भोवली