छत्रपती संभाजीनगर : राज्यात मागील काही महिन्यापासून महिलावरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहेत. मुंबई आणि पुण्यात घडलेल्या दोन घटनांवरून संपुर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. यातच आता एका व्यक्तीने मुलींवर होणाऱ्या हल्ल्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या रक्ताने पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीला १०० कोटी देत असतील तर आम्हाला २०० कोटी रूपये द्या,” मुख्यमंत्र्यांकडे शिंदे गटाची तक्रार
दिपेश पाटील या व्यक्तीने आपल्या रक्ताने पत्र लिहिून मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे विनंती केली आहे. अंबादास दानवे यांनी हे पत्र ट्विट केले असून यंदाच्या अधिवेशनात हा विषय नक्की माझ्याकडून मांडला जाईल. तसेच अशा पद्धतीने पत्र लिहून स्वत:ला त्रास करून घेऊ नका. आपली तळमळ माझ्याकडून नक्की एकली जाईल. असं आंबादास दानवेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्वाचे धनी तर उद्धव ठाकरे हा कलंकित करंटा”,भाजप नेत्याची जहरी टिका
दरम्यान, दिपेश पाटील यांनी पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. विशेष करून प्रेम प्रकरणात मुलींने नकार दिल्यास तिचे तुकडे केले जातात. नदीत, विहीत फेकून दिले जातात. खरंत तर हा पक्ष फुटला, तो पक्ष फुटला यापेक्षा महाराष्ट्रातील मुली कशा सुरक्षित राहतील याविषयी अधिवेशनात चौकशी करावी असं त्या पत्रात म्हटलं आहे.
महाराष्ट्राचा सुजाण नागरिक दीपेश पाटील याने मुलींवर होणाऱ्या हल्ल्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. मी शब्द देतो की यंदाच्या अधिवेशनात हा विषय नक्की माझ्याकडून मांडला जाईल. लोकांना माझी विनंतीही राहील की अशा पद्धतीने… pic.twitter.com/FGMsajmxy6
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…तृतीय पंथीय समाज नितेश राणेंना कोर्टात खेचणार, ठाकरेंवरील टिका नितेश राणेंना भोवली
हेही वाचा…“शिंदेंच्या मंत्र्यांना डच्चू, नव्या आमदारांना संधी, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ठरला”
हेही वाचा…काॅंग्रेसची लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरली..! दिल्लीत काॅंग्रेसच्या बैठकीत मोठा निर्णय
हेही वाचा…अमोल कोल्हेंकडे राष्ट्रवादीने दिली जबाबदारी, अजित पवार गटाच्याविरोधात मोठी रणनीती
हेही वाचा…अजित पवार यांच्याकडील अर्थखातं बरोबर राष्ट्रवादीला मिळणार ‘ही’ खाती