रायगड : शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही रखडलेला असून शिंदे गटातील आमदार मंत्रिपदाची आस धरून आहेत. यातच आता रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे आणि राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेस सुरू आहे. राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रायगडचं पालकमंत्री राष्ट्रवादीला मिळावं अशी मागणी होत असतांना त्यावर दावा आता शिंदे गटाने ठोकला आहे.
हेही वाचा…काॅंग्रेसची लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरली..! दिल्लीत काॅंग्रेसच्या बैठकीत मोठा निर्णय
शिंदे -फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झालेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद अदिती तटकरे यांना देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवाकार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केली आहे. तर रायगडचा पालकमंत्री हा भरतशेटच, अशी मागणी रायगडच्या सर्व आमदारांची आहे. ही मागणी शेवटपर्यंत राहिल असंही शिंदे गटाने म्हटलं आहे.
हेही वाचा…अमोल कोल्हेंकडे राष्ट्रवादीने दिली जबाबदारी, अजित पवार गटाच्याविरोधात मोठी रणनीती
दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज, बुधवारी सांयकाळी होण्याची शक्यता असून, त्यासाठीच्या हालचालींना मंगळवारी रात्री वेग आला होता. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही मंत्र्यांना डच्चू देण्याबरोबरच नव्या मंत्र्यांना शपथ देण्याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबते सुरू होती.
READ ALSO :
हेही वाचा…“कुठंही दिसला तरी तुझ्या तोंडाला काळं फासणार,” नितेश राणेंच्या विरोधात तृतीय पंथीय समाज आक्रमक
हेही वाचा…“एसटी कर्मचाऱ्यांच्या १२३ आत्महत्यांना शरद पवार जबाबदार”, गुणरत्ने सदावर्तेंची शरद पवारांवर टिका
हेही वाचा…“..म्हणून माझ्या रक्ताने तु्म्हाला पत्र लिहीत आहे,” तरूणांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
हेही वाचा…तृतीय पंथीय समाज नितेश राणेंना कोर्टात खेचणार, ठाकरेंवरील टिका नितेश राणेंना भोवली
हेही वाचा…“शिंदेंच्या मंत्र्यांना डच्चू, नव्या आमदारांना संधी, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ठरला”