पुणे : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेत सत्तेत सहभागी झाले. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांवर टिका करण्यास सुरूवात केलीय. यातच आता राषट्रवादीचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलेल्या टिकेवर आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“इतक्या कलंकित गोष्टी करून सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपासून दूर”
राष्ट्रवादीच्या विरोधात बंड केल्यानंतर रोहित पवारांनी बंडखोर मंत्र्यांच्याविरोधात अजून तुम्हाला काय हवं होतं. असं म्हणत निशाणा साधला होता. त्यावर दिलीप वळसे पाटलांनी रोहित पवारांना थेट आव्हान दिलं होतं. त्यावर आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. पाण्याच्या बाबतीत त्यांच्या मतदारसंघात जाऊन लोकांना खरी परिस्थिती सांगेन. जुन्नरला देखील त्याचं उत्तर देईन. अस्मिता, एखाद्या विचारासोबत राहण्याची निष्ठा ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी फक्त ३७ वर्ष लागले आहेत. त्यांच वय जास्त आहे. त्यांची खरी ती अडचण आहे. वयाचं कुणीही काढू नये. आज निष्ठा समजून गेलात. दहा वर्षांनी देखील निष्ठा कळते. अस म्हणत रोहित पवारांनी दिलीप वळसे पाटलांवर निशाणा साधला.
हेही वाचा…पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रीपद, आजच होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ?
दरम्यान, दिलीप वळसे पाटलांनी रोहित पवारांवर त्यांच्या वयावरून टिका केली होती. त्यावरून रोहित पवारांनी दिलीप वळसे पाटलांवर प्रतिक्रिया देत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मंत्रिमंडळाचा तिढा दिल्ली दरबारी, अजित पवार अमित शहांच्या भेटीला, शिंदे-फडणवीसही जाणार
हेही वाचा…गोगवालेंना ‘ते’ वाक्य भोवलं, रोहित पवारांसह आख्खी राष्ट्रवादी आदिती तटकरेंच्या पाठिंशी
हेही वाचा…“ .त्यावेळी मी मृत्यूची वाट पाहत होते…,” निलम गोऱ्हे हुंदका देत व्यक्त झाल्या
हेही वाचा…“आपल्या घाशातील घास खाणारी राष्ट्रवादी सरकारमध्ये आली”, बच्चू कडूंची पुन्हा नाराजी
हेही वाचा…मंत्रीमंडळ विस्तार : पुण्यातून आमदार मिसाळ यांना ‘कॉल’ अन् पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांची ‘विकेट’?