पुणे : राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला आहे. यातच शिंदे गट आणि राष्ट्रवादी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे. यातच शिंदे गटातील आमदार भरतशेठ गोगावले यांनी मंत्री अदिती तटकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गोगावले यांच्यावर सडकून टिका केलीय.
हेही वाचा…“आपल्या घाशातील घास खाणारी राष्ट्रवादी सरकारमध्ये आली”, बच्चू कडूंची पुन्हा नाराजी
शिंदे सरकारच्या पुढील मंत्रिमंडळात भरतशेठ गोगावले मंत्रिपदासाठी आतुर आहेत. यातच त्यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री देखील हवं आहे. परंतु राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री अदिती तटकरे यांनी पालकमंत्री पद देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी करीत आहेत. यातच अदिती तटकरे यांनी पालकमंत्री पद म्हणून चांगलं काम केलं असलं तरी त्यापेक्षा मी चांगलं काम करून दाखवेन. शेवटी महिला आणि पुरूषांमध्ये काही फरक आहे की नाही. असं गोगावले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मंत्रीमंडळ विस्तार : पुण्यातून आमदार मिसाळ यांना ‘कॉल’ अन् पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांची ‘विकेट’?
दरम्यान, भरतशेठ तुम्ही नादच केलाय थेट.! पालकमंत्री पदासाठई आपले हपापणे आपल्या स्वभावाला साजेसे आहेच. मात्र स्त्री आणि पुरूषांमध्ये फरक आहे, हे तुमचे उद्गार स्त्रीशक्तीला कमीपणा दाखवणारे आहेत. रायगडाच्या मातीचे महत्व तुम्हाला या निमित्ताने काही दिवसातच कळेल. तथास्तू. असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे.
भरतशेठ तुम्ही नादच केलाय थेट !
पालकमंत्री पदासाठी आपले हपापणे आपल्या स्वभावाला साजेसे आहेच मात्र स्त्री आणि पुरुषांमध्ये फरक आहे हे तुमचे उद्गार स्त्रीशक्तीला कमीपणा दाखवणारे आहेत. रायगडच्या मातीचे महत्व तुम्हाला यानिमित्ताने काही दिवसातच कळेल. तथास्तु.. @BharatGogawale pic.twitter.com/OhQ8yOcf7u— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांना दिल्लीतून दिलं टार्गेट, “लोकसभा निवडणुकीसाठी काहीही करा पण..”
हेही वाचा…“मतदारसंघात जाऊन उत्तर देणार,” रोहित पवारांचा दिलीप वळसे-पाटलांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…मंत्रिमंडळाचा तिढा दिल्ली दरबारी, अजित पवार अमित शहांच्या भेटीला, शिंदे-फडणवीसही जाणार
हेही वाचा…गोगवालेंना ‘ते’ वाक्य भोवलं, रोहित पवारांसह आख्खी राष्ट्रवादी आदिती तटकरेंच्या पाठिंशी
हेही वाचा…“ .त्यावेळी मी मृत्यूची वाट पाहत होते…,” निलम गोऱ्हे हुंदका देत व्यक्त झाल्या