श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरुद्ध नुकताच अपात्रतेचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. सदरील प्रस्ताव पुढे पाठवू नये यासाठी राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नहाटा यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना शिवीगाळ करत ते बसलेल्या सरकारी वाहनातून खाली ओढून त्यांना बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन नाहटा यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर बाळासाहेब नाहाटा यांना पोलिसांनी अटक केली आहे.
हे पण वाचा, साई संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार निलेश लंके यांची नियुक्ती करण्यासाठी ‘या’ ग्रामपंचायतीने मांडला ठराव
हे पण वाचा, साई संस्थानाच्या अध्यक्षपदाबाबतीत सत्यजित तांबे व आशुतोष काळे यांच्या नावासाठी मुबंईत खलबतं
सदरील घटना श्रीगोंदे येथील पंचायत समितीच्या सभागृहातील आवारासमोरच घडली. गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून नाहाटा यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणला, शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काळे यांनी म्हटले आहे की लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच यांचा अपात्रतेचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सादर करू नये यासाठी नाहाटा यांनी प्रयत्न केला.
हे पण वाचा, अजित पवारांच्या अज्ञात वासाचे केंद ‘अंबालिका’त भेट झाल्याचे वृत्त माजी मंत्री राम शिंदे यांनी फेटाळले
हे पण वाचा, गोपीचंद पडळकरांचा कर्जत-जामखेड मधील थेट वावर राम शिंदेची डोकेदुखी वाढवणारा
त्यानंतर सभागृहात प्रवेश करत नाहाटा यांनी काळे यांच्या कडे जात प्रस्ताव पाठवू नका असे म्हणत शिवीगाळ सुरु केली. काळे फिर्याद नेण्यासाठी निघाल्यावर त्यांच्या सहकारी वाहनाच्या दिशेने नाहाटा यांनी पायातील बूट काढून फेकून मारला आणि काळे यांना गाडीतून बाहेर काढत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.आपण काहीही केलेले नाही मात्र राष्ट्रवादीच्या नेत्याच्या एका फोनवरून काळे यांनी आपल्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. जामीन घेतल्यावर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू आणि जनतेसमोर खरे काय आहे हे आणू असे बाळासाहेब नाहाटा यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा
अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
“निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील
नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन