मुंबई : बीड येथील सभेत राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. काहीही चूक नसतांना मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यायाला सांगितलं होतं. असं म्हणत भुजबळांनी शरद पवारांवर निशाणा साधला. त्यावर आता शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“१५ कोटीचा फंड आणि पाच कोटीच्या कॅशवर ‘या’ माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली”
बीडच्या सभेत छगन भुजबळांनी शरद पवारांवर टिका केली. त्यावेळी ते म्हणाले की, २००३ मध्ये तेलगी प्रकरणात तेलगीला अटक करत त्याच्यावर मोक्का लावण्याचे आदेश मी दिले. तेव्हा मला बोलावलं आणि राजीनामा देण्यास सांगितलं. राजीनामा द्या. असं तुम्ही म्हटलं. नंतर फोन आला भुजबळांचा राजीनामा घेऊ नका. त्यांची काही चूक नाही. तरीही तुम्ही माझा राजीनामा घेतला. १९९२-९३ आणि १९९४ साली खैरनार यांनी तुमच्यावरही आरोप केले होते. पण तुमचा राजीनामा कुणीही मागितला नाही. मग माझा राजीनामा का घेतला? असा सवाल भुजबळांनी केला.
हेही वाचा…“..त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी दिसतील”
भुजबळांनी केलेल्या प्रश्नांवर शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलंय. मी त्यांना अटकेपासून वाचवलं. मी तर राजीनामा घ्यायला सांगितला नसता तर त्यांना तुरूंगात जावं लागलं असतं. असं शरद पवारांनी म्हटलंय. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलंय.
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीत चाललंय काय? फडणवीस अन् अजित पवारांमध्ये संघर्ष, पण यात ‘विखें’चा झाला गेम
हेही वाचा…अजित पवारांकडून भाजप नेत्यांची कोंडी, फडणवीसांनी अजित पवारांना दिला मोठा दणका
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारमधील इंजिन एकमेकांना आता धक्के मारताहेत”, वडेट्टीवारांनी शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…महायुतीत ठिणगी पेटली..,! फडणवीसांचा अजिदादांना दे धक्का, ‘तो’ निर्णय बदलला, भाजप नेत्यांना मोठा दिलासा
हेही वाचा…घड्याळ आणि पक्षनाव घेण्यासाठी इलेक्शन कमिशनमध्येही फिक्सींग, आव्हाडांचा मोठा दावा, पुरावाही दिला