मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक जण पक्ष प्रवेश करीत आहेत. यातच ठाकरे गटाचे मुंबईतील विक्रोळी विभागातील कन्नमवार नगरचे माजी नगरसेवक आणि राऊत बंधूंचे निकटवर्तीय उपेंद्र सावंत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याबाबत आता ठाकरे गटाचे आमदार विनायक राऊत यांनी उपेंद्र सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा…“वडेट्टीवारांची काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकांसोबत मोठी बैठक, राजकीय हालचाली सुरूय”
१० दिवसापुर्वी उपेंद्र सावंत मला म्हणाला की, मला सुद्धा ऑफर आहे. निधीकरिता १५ कोटी आणि पाच कोटी कॅशची ऑफर आहे. त्यावेळी तो मला म्हणाला मी निष्ठावंत आहे, मी घरी बसेल पण शिंदे गटात जाणार नाही. नंतर त्याला अनेकदा फोन केलेत. परंतु त्यांनी माझे फोन उचलले नाहीत. शेवटी त्याच्या बहिणीला फोन केला आणि मी तिला म्हणालो की मी नसतो तर तो आज जेलमध्ये असता असं सुनील राऊतांनी म्हटलं.
हेही वाचा…ठाकरेंचा मुंबईतील एक शिलेदार अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
दरम्यान, माझ्याकडे त्याच्या चार ते पाच क्लिप आशा आहेत की, त्या जर मी सोशल मीडियावर टाकल्या तर तो आपल्या मुलीला आणि बायकोला तोंड देखील दाखवणार नाही. परंतु अशा गोष्टी करणे योग्य नाही हे आम्हाला कळतं. मी उद्धव साहेबांना फोन लावला आणि त्यांना एक मॅसेज पाठवला पंधरा कोटीचा फंड आणि पाच कोटी कॅशवर उपेंद्र सावंतांनी पक्ष सोडून चालला आहे. असंही सुनील राऊतांनी सांगितले.
उबाठा गटाचे #मुंबई तील #विक्रोळी विभागातील #कन्नमवार_नगर चे माजी नगरसेवक आणि राऊत बंधूंचे निकटवर्तीय उपेंद्र सावंत यांनी #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे शिवसेनेमध्ये स्वागत करून त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सावंत यांनी यावेळी… pic.twitter.com/vY72guuSkU
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 30, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“..त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी दिसतील”
हेही वाचा…मोठी बातमी…! “ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराला पक्षात येण्यासाठी १०० कोटींची ऑफर” ,?
हेही वाचा…दोन्ही उपमुख्यमंत्री अन् मुख्यमंत्र्यामध्ये भांडण, सर्वसामान्यांचे सरकार असे काम करते का ? वडेट्टीवारांचा सवाल
हेही वाचा…“मोदींनी निवडणुकीपुर्वी पहिला धक्का, ‘रासप’ एनडीएतून बाहेर, जानकरांचा पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार”
हेही वाचा…“56 इंचाची छाती असलेले पंतप्रधानांना चीन घाबरत नाही का?” वडेट्टीवारांचा मोदींना सवाल, चीनचा विषय तापला