मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. यातच आता अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याची बातमी समोर आली आहे. तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील अजित पवारांना दे धक्का दिला आहे. यातच आता भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीतून काढून टाकण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय.
हेही वाचा…“..त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी दिसतील”
एनसीडीसीने मंजूर केलेले कर्ज मिळवण्यासाठी अजित पवार यांच्याकडून जाचक अटी घातल्या होत्या. यामुळे भाजपच्या कारखांनाना मोठा फटका बसला. यानंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना मोठा धक्का देत सर्व अटी रद्द केल्या. यातच आता राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीतून काढून टाकण्यात आलं आहे. त्यांच्या जागी आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार यांची वर्णी लागलीय. त्यामुळे राज्यात याची एकच चर्चा सध्या सुरूय.
हेही वाचा…मोठी बातमी…! “ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराला पक्षात येण्यासाठी १०० कोटींची ऑफर” ,?
दरम्यान, गेल्या आठवड्यात नव्या अटी लागू केल्यानंतर सारख कारखाने असलेल्या भाजप नेत्यांची कोंडी झाली. यामध्ये हर्षवर्धन जाधव, रावसाहेब दानवे, धनंजय महाडिक यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. आता नव्या अटींमुळे रावसाहेब दानवेंच्या नेतृत्वाखालीली शिष्टमंडळाने काल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी घेतलेले निर्णय त्यानंतर मागे घेण्यात आले. शासन निर्णय मागे घेतल्यानंतर अजित पवारांना फडणवीसांनी दे धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरूय.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांकडून भाजप नेत्यांची कोंडी, फडणवीसांनी अजित पवारांना दिला मोठा दणका
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारमधील इंजिन एकमेकांना आता धक्के मारताहेत”, वडेट्टीवारांनी शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…महायुतीत ठिणगी पेटली..,! फडणवीसांचा अजिदादांना दे धक्का, ‘तो’ निर्णय बदलला, भाजप नेत्यांना मोठा दिलासा
हेही वाचा…घड्याळ आणि पक्षनाव घेण्यासाठी इलेक्शन कमिशनमध्येही फिक्सींग, आव्हाडांचा मोठा दावा, पुरावाही दिला
हेही वाचा…“१५ कोटीचा फंड आणि पाच कोटीच्या कॅशवर ‘या’ माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली”