मुंबई : अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याची माहिती समोर येत आहे. यातच एनसीडीसीने मंजूर केलेले कर्ज मिळवण्यासाठी अजित पवार यांच्याकडून जाचक अटी घातल्या होत्या. यामुळे भाजपच्या कारखांनाना मोठा फटका बसला होता. यानंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. त्यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टिका केलीय.
हेही वाचा…दोन्ही उपमुख्यमंत्री अन् मुख्यमंत्र्यामध्ये भांडण, सर्वसामान्यांचे सरकार असे काम करते का ? वडेट्टीवारांचा सवाल
ट्रीपल इंजिन सरकारमधील इंजिन एकमेकांना आता धक्के मारत आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांवर बंधन घातली. पण पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी घातलेली बंधन हटवल्याचे वृत्त आले आहे. यातून सरकारची नाचक्की झाली. सरकारमध्ये कोणत्याही विषयावर एक धोरण नाही, फक्त आपआपल्या पक्षाच्या नेत्यांसाठी सरकार मधील तिन्ही पक्ष राबत आहेत. सर्वसामान्यांचे सरकार असे काम करते का? असा सवाल देखील वडेट्टीवारांनी केलाय.
हेही वाचा…“मोदींनी निवडणुकीपुर्वी पहिला धक्का, ‘रासप’ एनडीएतून बाहेर, जानकरांचा पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार”
दरम्यान, कारखान्यांच्या कर्जासाठी संचालकांनी वैयक्तिक सामुहिक जबाबदारीचे हमीपक्ष देण्याची अट अजित पवारांनी घातली होती. यामुळे भाजपच्या अनेक महत्वाच्या नेत्यांना याचा फटका बसण्याची शक्यता होती. या सर्व जाचक अटी देवेंद्र फडणवीसांनी रद्द केल्या आहेत. तसेच यापुढे आता अजित पवार यांनी कुठल्याही फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल. असा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रीपल इंजिन सरकार मधील इंजिन एकमेकांना आता धक्के मारत आहेत..
दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांवर बंधन घातली..पण पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी घातलेली बंधन हटवल्याचे वृत्त आले आहे.. यातून सरकारची नाचक्की झाली……
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 30, 2023
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीत ठिणगी पेटली..,! फडणवीसांचा अजिदादांना दे धक्का, ‘तो’ निर्णय बदलला, भाजप नेत्यांना मोठा दिलासा
हेही वाचा…घड्याळ आणि पक्षनाव घेण्यासाठी इलेक्शन कमिशनमध्येही फिक्सींग, आव्हाडांचा मोठा दावा, पुरावाही दिला
हेही वाचा…“१५ कोटीचा फंड आणि पाच कोटीच्या कॅशवर ‘या’ माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली”
हेही वाचा…“..त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी दिसतील”
हेही वाचा…मोठी बातमी…! “ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराला पक्षात येण्यासाठी १०० कोटींची ऑफर” ,?