गडचिरोली : भाजपचे खासदार अशोक नेते यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. गडचिरोली येथून वीरगावच्या दिशेने येत असतांना हा अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र या अपघात अशोक नेते यांना सुदैवाने कोणतीही इचा झाली नाही. परंतु त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये गाडीचं पुढच्या बाजूने मोठं नुकसान झालंय.
हेही वाचा…उद्या तब्बल २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान, अनेक पक्षाच्या नेत्यांचं भवितव्य टांगणीला
खासदार अशोक नेते हे ३ नोव्हेंबरला मध्यरात्री मुंबईतून नागपुरला पोहचले होते. त्यानंतर नागपुर येथील शासकी विश्रामगृहात मुक्काम करून ४ नोव्हेंबरला सकाळी ते गडचिरोलीला जाण्यासाठी चारचाकी वाहनाने निघाले होते. विहिरीगावजवळ त्यांच्या वाहनासमोर अचानक डंबर आले व समोरासमोर जोराची धडक झाली आहे. यावेळी खासदार अशोक नेते यांच्यासह चालक, दोन सुरक्षारक्षक व अन्य एक असे पाच जण वाहनात होते.
हेही वाचा…“मराठा आणि कुणबी एकच, त्यासंदर्भात ब्रिटिशकालीन पुरावे”, प्रवीण गायकवाडांचं मोठं विधान
अपघात झाला तेव्हा अशोक नेते हे समोरील सीटवर बसले होते त्यांच्यासह चालकाची एअरबॅग उघडली ,त्यामुळे त्या दोघांसह आतील इतर तीन प्रवाशी सुखरूप बचावले आहेत. यानंतर मोठी गर्दी झाली. पोलिसांनी धाव घेत पाहणी केली.
READ ALSO :
हेही वाचा…अंबानींनकडून ४०० कोटींची खंडणी मागणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, तेलंगणातून केली अटक
हेही वाचा…“कुठल्या नेत्यांकडे कोण कोण गेले होते ते सर्व बाहेर काढेन ?” फडणवीसांनी कुणाला दिला इशारा ?
हेही वाचा…“अजित दादांच्या दबावामुळेच कार्यक्रमाचं निमंत्रण रद्द, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप”
हेही वाचा…“काहीच देणं घेणं नसल्यासारखं आपण मात्र बद्रीनाथच्या दर्शनाला निघून जायचं”, शिंदे गटाची ठाकरेंवर टिका
हेही वाचा…अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस आमनेसामने, बारामतीच्या ‘या’ गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान