मुंबई : बीग बॉस विजेता एल्विश यादववर रेव्ह पार्टी आणि इतर गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. यानंतर एल्विश यादव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्षा बंगल्यावरील फोटो व्हायरल होत आहे. यावरून राज्याती विरोधी पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका करतांना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिकाकारांना जोरदार इशारा दिलाय.
हेही वाचा…“मराठा समाजाला आरक्षण दिल्यास काय होईल?” वकिल गुणरत्ने सदावर्तेंचा मराठा आरक्षणाला विरोध का ?
गणेश उत्सवात मुख्यमंत्र्यांकडे वेगवेगळे सेलिब्रिटी येत असतात. त्यावेळेस एल्विश यादव रियालीटी शो जिंकला होता. त्यावेळी तो एक सेलिब्रिटी होता. असे अनेक सेलिब्रिटी येऊन जातात. ज्या वेळेस आला तेव्हा त्याच्यावर कुठला आरोप नव्हता. त्यामुळे आता त्याच्यावर आरोप आहे. मात्र असेच जर असेल तर कुठल्या नेत्यांकडे कोण कोण गेले होते ते बाहेर काढले तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची नावे समारे येतील असा इशारा फडणवीसांनी दिलाय.
हेही वाचा…काकाची पुतण्याच्या मतदारसंघात एंन्ट्री..! राज ठाकरे वरळी मतदारसंघात दाखल
दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यात ड्रग्ज प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. यातच एल्विश यादववर ड्र्ग्ज सल्पायचा देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांवर टिका करीत आहेत. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना इशारा दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित दादांच्या दबावामुळेच कार्यक्रमाचं निमंत्रण रद्द, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप”
हेही वाचा…“काहीच देणं घेणं नसल्यासारखं आपण मात्र बद्रीनाथच्या दर्शनाला निघून जायचं”, शिंदे गटाची ठाकरेंवर टिका
हेही वाचा…अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस आमनेसामने, बारामतीच्या ‘या’ गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान
हेही वाचा…उद्या तब्बल २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान, अनेक पक्षाच्या नेत्यांचं भवितव्य टांगणीला
हेही वाचा…“मराठा आणि कुणबी एकच, त्यासंदर्भात ब्रिटिशकालीन पुरावे”, प्रवीण गायकवाडांचं मोठं विधान