माथेरान : ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शिवसेनेला शह देण्यासाठी काही नगरसेवकांना आपल्या गळाला लावले होते. शिवसेनेच्या 10 नगरसवेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांच्यावर अपात्रेची वेळ आली. त्यामुळे भाजपला नगरसवेक फोडूनही नगरपालिकेत वर्चस्व गाजवता येणार नाही, हे स्पष्ट झालेय.
अकोल्यात वंचितच्या सत्तेला धक्का; दोन्ही सभापतीपदांवर महाविकास आघाडीचा विजय; भाजपचीही साथ
माथेरान नगरपालिकेत भाजपला मोठा धक्का बसला. शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 10 नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी हा निर्णय दिला आहे. माथेरान नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथस आरोग्य सभापती आकाश कन्हैया चौधरी, नगरसेवक राकेश नरेंद्र चौधरी, संदीप कदम, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव, सोनम दाभेकर, महिला बालकल्याण समितीचे सभापती, प्रतिभा घावरे, शिक्षण समितीचे सभापती, रुपाली आरवाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे या दहा नगरसेवकांवर जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी आपत्रातेची कारवाई केली आहे.
पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणवीसांचा पोपट चिट्ठ्या काढतो; नवाब मलिकांचा पटलवार
दरम्यान, अंतर्गत वादाला कंटाळून या 10 नगरसेवकांनी 27 मे रोजी कोल्हापूर इथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या 10 नगरसेवकांच्या राजकीय प्रवेशाला शिवसेनेने हरकत घेतली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या 10 नगरसेवकांच्या राजकीय भवितव्यावर मोठ्ठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचवेळी भाजपलाही जोरदार दणका मिळाला आहे.
Read Also :
- असं का? लै मस्ती आलीये वाटतं? उदयनराजेंनी थोपटले दंड
- जिल्हा नियोजन समितीच्या निधी वर्ग करू नका, अन्यथा आत्मदहन करू; शिवसेना आमदाराचा इशारा
- तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याने कमावलेल्या उत्पन्नातून एसटी चालेल; नारायण राणेंचा अनिल परबांवर घणाघात
- छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे नाशिकमध्ये एकाच मंचावर येणार; काय आहे नेमकं कारण…वाचा…
- अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर, मन्नतवर दिवाळी; राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी थंडावणार?