सातारा : “सातारा जिल्हा बँकेच्या पॅनेलमध्ये मला घेणारे ते कोण मी ठरवतो कुठे जायचे ते माझी जिरवण्यासाठी फील्डिंग लावणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे मला विरोध करा पण सभासदांची जिरवू नका”, असे टोमणे मारत खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी पॅनलवर निशाणा साधला आहे.
एसटी चालकाची आत्महत्या; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “असं का? लै मस्ती आलीये? बघू. तुम्ही इकडचे, तिकडचे बोलवून घ्या लोकांना…आपण टाईट करु, जिरवू. माझी नका जिरवू, मेहेरबानी करा, माझी विनंती आहे. मी तुमचा कोणाचा दुश्मन नाही, हात जोडून विनंती करतो. बँक शेतकरी सभासदांची आहे, मी त्या गोरगरीब शेतकऱी बांधवांच्या वतीने विनंती करतो, त्यांची जिरवू नका. हात जोडून विनंती करतो, माझी जिरवायची तर जिरवा”.
गुन्हेगारीवरून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय चिखलफेक; गुंडगिरीत सहभागाचा महापौरांचा आरोप
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत साताऱ्याच्या दोन्ही राजांचा संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सर्वपक्षीय पॅनेलमध्ये समावेश केला नसल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी जाब विचारला होता. याबाबत मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न शरद पवार यांना विचारा, असे स्पष्ट करत बँकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना पवारांकडे जाण्याचा सल्ला दिला होता.
अकोल्यात वंचितच्या सत्तेला धक्का; दोन्ही सभापतीपदांवर महाविकास आघाडीचा विजय; भाजपचीही साथ
बँकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले. सत्ताधारी पॅनलमधून खासदार उदयनराजेंना उमेदवारी देण्याबाबत एकमत न झाल्याने उदयनराजेंच्या विरोधात सत्ताधारी पॅनेलने निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी पॅनेलच्या आमदार मकरंद पाटील यांच्यासह राजेंद्र राजपुरे व शिवरूपराजे खर्डेकर हे तिघेही एक एक अर्ज आल्याने बिनविरोध झाले आहेत.
Read Also :
- जिल्हा नियोजन समितीच्या निधी वर्ग करू नका, अन्यथा आत्मदहन करू; शिवसेना आमदाराचा इशारा
- तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याने कमावलेल्या उत्पन्नातून एसटी चालेल; नारायण राणेंचा अनिल परबांवर घणाघात
- छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे नाशिकमध्ये एकाच मंचावर येणार; काय आहे नेमकं कारण…वाचा…
- अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर, मन्नतवर दिवाळी; राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी थंडावणार?
- पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणवीसांचा पोपट चिट्ठ्या काढतो; नवाब मलिकांचा पटलवार