लक्षद्वीप : देशात भाजपच्या वर्चस्वाला धक्के बसायला सुरुवात झाली असून, आता पक्षाला अजून एक मोठे खिंडार पडले आहे. यावेळी भाजपच्या तब्ब्ल १५ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाकडे आपला राजीनामा देऊन, भाजपला रामराम ठोकला आहे.
लक्षद्वीपमध्ये भाजपला हा मोठा धक्का बसला असून, चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाच्याविरोधात दाखल केलेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्यानंतर इथे भाजप नेत्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे.
लक्षद्वीपमध्ये एका दूरचित्रवाहिनीवरील चर्चात्मक कार्यक्रमात आयशा सुल्ताना यांनी, लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी इथे घेतलेले निर्णय आणि महामारीच्या रुग्णांची बेटावर वाढत असणारी संख्या यावरुन टीका केली होती. यानंतर त्यांच्यावर कावारत्ती पोलीस स्टेशनमध्ये राजद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला.
15 Lakshadweep BJP leaders and workers resigned over sedition FIR against filmmaker Aisha Sultana.
You've filed a false & unjustified complaint against Chetlath sister. We convey our strong objection and submit our resignations: State secy Abdul Hameed Mullipuzha
— ANI (@ANI) June 12, 2021
राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये भाजप राज्य सचिव अब्दुल हामिद मुल्लीपुरा, वक्फ बोर्डाचे सदस्य उम्मुल कुलूस पुथियापुरा, खादी बोर्डाचे सदस्य सैफुल्ला पक्कियोडा, जाबिर सलीहथ मंजिल आणि इतर काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी, ‘आपल्या चेतलाथच्या बहिणीविरोधात खोटी आणि अयोग्य तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमचा याला आक्षेप आहे आणि त्यामुळे आम्ही आमचा राजीनामा पक्षाला देत आहोत,’ अशी प्रतिक्रिया अब्दुल हामिद यांनी माध्यमांना दिली आहे.
Read Also :
- मुख्यमंत्र्यांनी “अब मेरे साथ दो और साथी” म्हटल्यावर, पंतप्रधानांनी लगेच वेळ दिली
- २०२४ च्या निवडणुकीत जयंत पाटलांना घरी पाठवू – चंद्रकांत पाटील
- नक्षलवाद्यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, छत्रपती संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया
- लॉकडाऊन शिथिल झाला तरी निष्काळजीपणा नको, बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
- भाजपचे राम शिंदे पवारांच्या दारात; चर्चेला उधाण