मुंबई : तुमचाही दाभोळकर करू अशी धमकी सौरभ पिंपळकर यानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिली. यानंतर राज्यातील राजकारण चांगलचं तापलं. यातच सौरभ पिंपळकर याचा भाजपशी संबंध असून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू”, भाजपवर जहरी टिका
सौरभ पिंपळकरपेक्षाही वाईट आणि घाणेरड्या शब्दांचा वापर करीत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसांना ट्रोल केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात फडणवीसांच्या व्यक्तिगत जीवनावर शिंतोंडे उडवण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात उबाठा आणि राष्ट्रवादीच्या वॉररूममधून फडणवीसांची बदनामी केली. असा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.
हेही वाचा…“ह्यदयात महाराष्ट्र..अन् नजरेसमोर राष्ट्र.. म्हणत अजित पवाराचं सुचक वक्तव्य, शरद पवारांनी भाकरी फिरवली पण…
कालपासून शरद पवारांबद्दल नरेटि्ह सेट केल्या जात आहे. त्यांना धमकी आलेले अकाऊंट वेगळे आहे. सौरभ पिंपळकरने दुसऱ्याच्या अकाऊंटला फॉलो करीत रिट्विट केले. पण त्या संपुर्ण रिट्विटमध्ये शरद पवार यांना कुठेही धमकी देणे असा कुठेही उल्लेख नाही. तरीही अशा गोष्टींचे आम्ही समर्थन करता येत नाही. पिंपळकरणे रिट्विट करणेही चुकच आहे. असंही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा…“पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी..”, राष्ट्रवादीने नवी जबाबदारी दिल्यानंतर सुळेंची प्रतिक्रिया
दरम्यान, शरद पवार यांना कोणी धमकी दिली तर महाराष्ट्र सहन करणार नाही आणि फडणवीस सहन करणार नाही. सौरभ पिंपळकरने शरद पवार यांना धमकीच दिलेली नाही. तरीही त्याच भांडवल करून भाजपला बदनाम केले जात आहे. रावसाहेब दानवे आणि माझ्यासोबतची त्याची छायाचित्रे प्रसिद्ध करीत नाहक राळ उठवली जात आहे. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…अमित शाह काॅंग्रेसच्या बालेकिल्ल्यात, नांदेडमध्ये जाहीर सभा, काहीही होणार नाही, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
हेही वाचा…संजय राऊतांनी ती चूक टाळली, अजित पवारांचं बोलणं लक्षात ठेवलं पाहिजे
हेही वाचा…“दिल्लीच्या पातशाहांना पत्र लिहून औरंग्याच्या स्मारकाचा दर्जा काढायला सांगा”, दानवें अन् भाजपात ट्विटवार
हेही वाचा…“शरद पवारांना धमकी देणाऱ्यावर ‘देशद्रोहाचा गुन्हा’ दाखल करा, अन्यथा…”, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक
हेही वाचा…“अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाही”, जयंत पाटलांची नाराजीवर प्रतिक्रिया