IMPIMP
BJP eye on Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha; BJP is preparing to field 'this' cabinet minister BJP eye on Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha; BJP is preparing to field 'this' cabinet minister

रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवर भाजपचा डोळा ; भाजप ‘या’ कॅबिनेट मंत्र्याला मैदानात उतरवण्याच्या तयारीत

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. या लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असून मंत्री रविंद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीच्या जागावाटपात आता ही जागा नेमकी कुणाला जाणार ? याचा उत्सुकता लागून राहिलीय.

हेही वाचा..“नववर्ष मावळतांना मावळची जागा आपली पाहिजे”, मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा नेता ठरला ? 

अलिकडेच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मोठी रणनिती आखली आहे. यातच राज्यातील काही मंत्र्यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू झाल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे  रविंद्र चव्हाण यांना तयारी करण्याचे आदेश भाजपच्या वरिष्ठाने दिले असल्याची माहिती समोर आलीय.

हेही वाचा..आदित्य ठाकरेंचा कोल्हापुर दौरा, ‘या’ दोन ठिकाणी ठाकरेंची तोफ धडाडणार 

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार विनायक राऊत असून सध्या ते ठाकरे गटात आहेत. तर दुसऱ्या बाजूला ही जागा महायुतीतून आम्हालाच मिळावी, अशी मागणी शिंदे गटाने केलीय. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात चिपळून, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी रत्नागिरी उदय सामंत, कणकवली नितेश राणे, राजापूर राजन साळवी, कुडाळ वैभव नाईक, कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर गोविंदराव निकम, सावंतवाडीतून दिपक केसरकर आमदार आहेत.

महायुतीत नितेश राणे भाजप आणि राष्ट्रवादीचे शेखर निकम असे प्रत्येकी एक आमदार आणि फुटलेल्या शिवसेनेचे दीपक केसरकर, उदय सामंत असे दोन आमदार आहेत. ठाकरे गटापेक्षा भाजप एक पाऊल पुढे वाटत असताना चिपळूणची राष्ट्रवादी खासदार राऊत यांच्याबरोबर राहिली असती तर त्यांना मोठा आधार मिळाला असता; परंतू राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनीही अजित पवार यांना साथ दिली. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे.

फुटलेल्या शिवसेनेतून रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक आहेत. ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल; मात्र खासदार विनायक राऊत हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप आणि फुटलेल्या शिवसेनेची मते एकत्र होणार आहेत. काँग्रेस, राष्टवादी, वंचित आणि ठाकरेंच्या शिवसेनेची मते एकत्र होणार होती. या मतदार संघातील सहापैकी वैभव नाईक, राजन साळवी हे दोन आमदार ठाकरे गटाचे आहेत.

READ ALSO :

हेही वाचा..राष्ट्रवादीतल्या सासऱ्यावर भाजपमधील सून भारी पडणार का? ; ‘या’ लोकसभा मतदारसंघात निवडणूक गाजणार 

हेही वाचा..“पुर्वी मंबाजी, तुंबाजी होते, आताच्या काळात मिटकरी आहेत”, शरद पवार गटाने मिटकरींना डिवचलं 

हेही वाचामहायुतीत जागांचा पेच वाढला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ‘या’ जागांवर दावा सांगितला 

हेही वाचा…आगामी निवडणुकीत भाजपकडून धक्कातंत्राचा वापर ; फडणवीसांनी नेत्यांना दिली ‘ही’ तंबी 

हेही वाचा“मुथरेत श्रीकृष्ण मंदिर उभारावं,” नितेश राणेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी