मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे-भाजप युतीने चांगलीच तयारी केल्याचं दिसून येत आहे. अशातच आता भाजपसोबत युतीत असणाऱ्या एका पक्षाने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा दावा केला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ‘भाजप RPI शिवसेना’ महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
हेही वाचा… Big Breaking : महापालिका निवडणुका कधी होणार?; चंद्रकांत पाटील यांनी थेट सांगितला महिना..!
मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आल्यास भाजपचा महापौर आणि RPIचा उपमहापौर होईल. 5 वर्षात पहिला अडीच वर्ष उपमहापौर RPIचा आणि दुसऱ्या टर्मममध्ये उपमहापौर शिवसेनेचा होईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शिंदे गटाला दुय्यम स्थान का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांना RPIच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणायचे. भाजप शिवसेनेने RPIच्या उमेदवारांनाही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन रामदास आठवले यांनी बोलताना केलं आहे. मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात बोलताना रामदास आठवले यांनी हा दावा केला आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित होते.
हेही वाचा…“अजित पवार यांची गणना भाजपच्या अंधभक्तात होऊ नये ही आशा”
भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी 5 वर्षात पहिला उपमहापौर आरपीआयचाच होईल असं आश्वासन केलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मित्र धर्म पाळणारे आदर्श नेते आहेत असे सांगत आशिष शेलार यांनी रामदास आठवले यांच्यावर कविता देखील केली.
दरम्यान, गेली ४० वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे आजवर महापौर पद देखील शिवसेनेकडेच राहिलेले आहे. मात्र आता पक्षात झालेल्या बंडानंतर भाजपसोबतच्या महायुतीमध्ये शिंदे गटाला केवळ उपमहापौर पद मिळणार असल्याचं एक प्रकारे रामदास आठवले यांच्या विधानामुळे स्पष्ट झालं आहे.
Read also
हेही वाचा… Big News: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, दोन आमदार करणार पक्षांतर !
हेही वाचा… मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग, अमित शाह लवकरच…
हेही वाचा… लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? काय म्हणाले शहराध्यक्ष प्रशांत जगताप?
हेही वाचा… उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेना भवन, सर्व शाखा आणि निधी यावर शिंदे गटाकडून दावा