पुणे – संभाजीराजे भोसले यांची राज्यसभा खासदारकीची मुदत संपल्यानंतर ते आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पुढील राजकीय वाटचालीची भूमिका जाहीर करणार आहेत. दुपारी १२ वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. संभाजीराजे यांना ६ वर्षांपूर्वी भाजपने राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार केले. तेव्हापासून ते या पक्षाचे सहयोगी सदस्य होते. मात्र पक्षाच्या व्यासपीठापासून ते कायम दूर राहिले. आता खासदारकीची मुदत संपल्यानंतर ते नव्या राजकीय वाटचालीची घोषणा करणार आहेत.
“कुणी कितीही टोकाची भूमिका घेतली तरी अयोध्येला जाणारच”; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा इशारा
संभाजीराजे महाविकास आघाडीसोबत जाण्याची चर्चा सध्या सुरू आहे. नुकतीच त्यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संधी मिळण्यात फडणवीस यांचे योगदान असल्याने आपण त्यांचे आभार मानण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे संभाजीराजेंनी स्पष्ट केले असले तरी विविध तर्क-वितर्क लावले जात आहे.
तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांबरोबर चर्चा करून संभाजीराजांना राज्यसभेवर पाठविण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले आहे. त्यामुळे संभाजीराजेंची पुढील राजकीय दिशा नेमकी काय असणार, हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेकडून राणा दाम्पत्यांविरोधात सुडाचं राजकारण; नियमांची पायमल्ली करत सत्तेचा गैरवापर सुरुच
महाविकास आघाडीकडून संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवणे शक्य झाले नाही तर ते राज्यातून ज्या सहा जागा राज्यसभेवर पाठवले जाणार आहेत त्यातील सहाव्या जागेवर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडीने एकत्रित त्यांना मदत केली तर ते या जागेवर विजयी होऊ शकतात.
Read also:
- शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन; दुबईवरून पार्थिव आणण्याचे प्रयत्न सुरू
- राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील वाद दिल्लीत जाणार! राष्ट्रवादी-भाजप संबंध उघडे पाडण्याचा पटोलेंचा इशारा
- ‘राष्ट्रवादीने सुरा खुपसला’ हा नाना पटोलेंचा आरोप चुकीचा – जयंत पाटील
- जे कुटुंब प्रेमळ तिथं भांड्याला भांड लागतंच; नाना पाटोलेंच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची सारवासारव
- तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात संभाजी राजेंना प्रवेश नाकारला, अन्..;