पुणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे सांगत या आरक्षणाला स्थगिती दिली. आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीनंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाडून एकमेकांवरआरोप प्रत्यारोप करत असल्याचे दिसत आहे. याचाच भाग म्हणजे आज सकाळी या विरोधात आज पुण्यात भाजप खासदार गिरीष बापट यांच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले.
ठाकरे सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले; भाजप नेते गिरीष महाजनांचा गंभीर आरोप
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, मोदी सरकारने ओबीसी बांधवांच्या आरक्षणासाठी आवश्यक असलेला इम्पिरिकल डेटा सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केवळ महाराष्ट्रातील नवे तर देशभरात अनेक राज्यांतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी जानेवारी २०१४ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात UPA सरकारने ओबीसी बांधवांचा इम्पिरिकल डेटा स्वीकारून ओबीसी बांधवांचं आरक्षण अबाधित राखले होते. मात्र मे २०१४ मध्ये देशातील जनतेला फसवून नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आलं आणि इम्पिरिकल डेटा मध्ये दोष आहेत असं कारण देत मोदी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या वाटेत काटे पेरले.
ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट – आमदार महेश लांडगे
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, राज्यात भाजपची सत्ता असतानाच भाजपचा पदाधिकारी असलेल्या अवधूत वाघ याने ओबीसी आरक्षणाला आव्हान दिलं हा केवळ योगायोग नाही, हा भाजपने विचारपूर्वक रचलेला कट आहे. असे असतानाही भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी काल ओबीसी बांधवांबाबत खोटा कळवळा दाखवत आंदोलन केले, ओबीसी बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसणाच काम केलं आहे. यांना जोड्याने हानला पाहिजे, भारतीय जनता पक्षाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. हा निषेध व्यक्त करण्यासाठीच आम्ही आज भाजपचे खा. गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत. बापट हे संसदेचे सदस्य आहेत, दिल्लीत संसदेचे अधिवेशन सध्या सुरु आहे. खा. बापट यांनी इम्पिरिकल डेटा जाहीर करण्याची मागणी संसदेत करावी, त्यात काय दोष आहेत तेही देशासमोर जाहीर करावे, असेही त्यांनी सांगितले.
Read Also :
- राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; होर्डिंगवरून फोटो गायब
- मी जर उत्तर दिलं तर तुमची प्रकृती बिघडेल; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
- संजय राऊत हे एक नंबरचे डबलढोलकी आहेत; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
- महाराष्ट्राने केले उद्योगक्षेत्रात विक्रमी करार; एकाच दिवसात तब्ब्ल ५०५१ कोटींची गुंतवणूक.!
- नगरपंचायतीसाठी पारनेरमध्ये आमदार निलेश लंके विरुद्ध सर्वपक्षीय लढत बघायला मिळणार.!