मुंबई : मशिदीवरील अनधिकृत भोंगे खाली उतरवल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे. त्यांवरून सध्या सत्ताधारी पक्षांकडून राज ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली जात आहे. याचाच संदर्भ देत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
अकलेचा अन् तुमचा काडीचा तरी संबंध आहे का? आले चॅनलचे बूम अन् ठोकली धूम
महाराष्ट्र सरकार नेहमी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत आलं आहे. भोंग्याचा विषय राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही राजकीय भोंगेबाजी असून आता योगी कोण? असा सवाल संजय राऊत त्यांनी उपस्थित केला आहे. हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन अचानक कसं झालं? हा एक संशोधनाचा विषय आहे. एखाद्या विद्यार्थ्यांने यावर पीएचडी करायला हवी, असा टोला देखील संजय राऊतांनी लगावला आहे. यावर चित्रा वाघ यांनी भाष्य केलं आहे.
ऐ मनके “रोगी” तु भी ईलाज करले हमारे “कर्मयोगी”से ; अमृता फडणवीसांना युवासेनेचे जोरदार प्रत्युत्तर
चित्रा वाघ म्हणाल्या की, राज ठाकरे यांचं योगींसंदर्भात मतपरिवर्तन कसं झालं. ही पीएचडीचा विषय असं इति सर्वज्ञानी जनाब संजय राऊत म्हणाताहेत. मग शिवसेनेचे वैचारिक मतपरिवर्तन हा तर नोबेल पारितोषिकाचा विषय आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी राऊतांना प्रत्युत्तर उत्तर दिलं आहे.
दरम्यान, राज्यात सध्या भोंग्यांचा विषय खुप चर्चेला आला आहे. मनसे अध्यक्ष यांची देखील 1 मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा होत आहे. तर त्याच दिवशी मुंबईत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची बुस्टर डोस सभा होत आहे. तर उद्धव ठाकरे यांची देखील पुण्यात सभा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभांमध्ये पुन्हा एकदा भोंग्यांचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.
Read also:
- “भाजप-मनसे युती झाली की नाही, तेच समजत नाही”; अजित पवारांची युतीसंदर्भात मिश्किल टिप्पणी
- “भाजप मनसेच्या युतीसंदर्भात संघ कधीही पुढाकार घेणार नाही”; भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा दावा
- “मंत्री जेलमध्ये तरीही महाराष्ट्र शासनाने निर्णय जाहीर केलाय”; निलेश राणेंची राज्य सरकारवर खोचक टिप्पणी
- “पुरी ताकद से बताएं, पेट्रोल के दाम कम हुए के नहीं हुए ! इंधन दरवाढीबाबत राष्ट्रवादीचं अनोखे आंदोलन
- “पंतप्रधानांनाकडून सावत्रपणाची वागणूक मिळतेय”; संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर टिका