पिंपरी चिंचवड : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मिशन ४५ च्या माध्यमातून प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा दौरा करीत आहेत. यातच मावळ लोकसभा प्रवास दौरा तसेच घर चलो अभियानाच्या निमित्ताने बावनकुळे पिंपरी चिंचवडमध्ये येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजप महिला आमदारांचा पारा चढला अन् भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चांगलचं सुनावलं.
हेही वाचा…“अजित पवार गटाकडून पवारांवर दुसऱ्यांदा केला गंभीर आरोप,” आयोगात जोरदार खडाजंगी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ११ ऑक्टोंबर रोजी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याची माहिती देण्यासाठी शहर भाजपने पत्रकार परिषद बोलवली होती. या परिषदेच्या वेळी आमदार आश्विनी जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, शहाराध्यक्ष शंकर जगताप, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळुराम बारणे, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, सरचिटणीस नामदेव ढाके, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे आदि उपस्थित होते.
हेही वाचा…“पक्षावर एकच व्यक्ती वचर्स्व गाजवू शकत नाही”, अजित पवार गटाने आयोगात दिला ‘त्या’ प्रकरणाचा दाखला
यावेळी पाठीमागून वार करणे सोडा, माझ्या नादी लागू नका, मला हलक्यात घेऊ नका, असा सज्जद दम भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांनी पक्ष संघटनेतील एका पदाधिकाऱ्याला दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे आता पिंपरी चिंचवडच्या राजकारणात याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे. यातच अश्विनी जगताप यांनी नेमकं कुणाला सुनावलं ? याचीही चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम, कार्यक्रमात साप शिरला अन्….
हेही वाचा…धक्कादायक..! “शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जा’ळ’ले,’ सुळेंचा सरकारवर पारा चढला, केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…“ज्या दिवशी माझी बोलायची वेळ येईल, त्यावेळी मी या सर्वांना ‘न’ग्न’ करून टाकेन”, शिंदे गटाच्या आमदाराचा पारा चढला
हेही वाचा…“राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा,” ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी, अन् ‘या’ जिल्ह्यात तब्बल ३०९ कार्यकर्त्यांनी पवारांची साथ सोडली