पुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी केली आहे. यासह त्यागाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा सर्वात मोठा ८० मीटरचा ध्वज उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर नामांकित रूग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सोन्याचा मंदिर उभारण्यात येणार असल्याचीही घोषणा शरद सोनवणे यांनी केली आहे.
हेही वाचा…” छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
गोद्रे या गावात २५ एकर मध्ये जगातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘सुवर्ण मंदिर’ उभारण्यात येणार आहे. याच ठिकाणी जगातील सर्वात मोठा पुतळा आणि त्याच्या पाठीमागे सर्वात मोठा भगवा ध्वज फक्त एक वर्षाच्या आत श्रीमंत योगी स्मारक ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येणार असल्याचं सोनवणे यांनी म्हटलं आहे. पुतळ्यासह सदरील जागेमध्ये शिवकालीन इतिहास जागवणारे काम ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार असून संपूर्ण उभारणी आणि पुढे देखभाल ट्रस्टच्या माध्यमातून केली असणार असल्याची माहिती यावेळी सोनवणे यांनी दिली.
हेही वाचा…“पुन्हा हे असं घडलं तर गालावर वळ उठतील,” मुंलूंडच्या घटनेवरून राज ठाकरेंचा इशारा
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मेड इन इंडियाचा बनवणार असून संपुर्ण पुतळा ब्रॉंझ या धातूपासून बनवण्यात येणार आहे. यासाठी शिवनेरी परिसरात पाच किी अंतरावरील गोद्रे या गावात उभारण्यात येणार आहे. जीवाची बाजू लावून सर्व समाजाचे मंदिर, धर्मस्थळे आबादित ठेवली. स्वत: च्या जीवापेक्षा त्याला संरक्षण दिलं. त्या छक्षपती शिवरायांचा जगातला पहिला सुवर्ण मंदिर स्थापन करणार आहोत. शिवरायांचे विचार सोन्याचे होते. त्यामुळे छत्रपतींचा सिंहासन, शिल्प, सोन्याचं असणार आहे.
हेही वाचा…रोहित पवारांच्या ‘बारामती ॲग्रो’ला नोटीस, ‘बारामती ॲग्रो’ नेमकी काय आहे ? वाचा सविस्तर
यासह २५ एकरमध्ये पहिला महाद्वार हा दगडी असून तो चुन्याने बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराजांच्या जीवनावर आधारीत ग्रंथालय, शिवभक्तासाठी भोजनालय आणि शिवभक्तांसाठी प्रत्येक दिवशी एक वेळा महाप्रसाद मिळणार आहे. तसेच छत्रपती शिवरायांच्या संपुर्ण जीवनावर आधारीत लघुपट लेझर वाॅटर शो द्वारे दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी मोठा हॉल बांधण्यात येणार आहे. असं शरद सोनवणे यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सकाळी शाळा, अन् सांयकाळी शाळेच्याच मैदानावर गौतमी पाटीलचा डान्स,” शिक्षणमंत्री केसरकर कारवाई करणार का ?
हेही वाचा…महाराष्ट्रातील लोकशाहीचा घात होत असताना नार्वेकर ‘घाना’ला का जात आहे ? ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“जगाला दाखवण्यासाठी गांधी आणि मनामध्ये गोडसे हे भाजपाचे ढोंग!” काॅंग्रेसची जोरदार टिका
हेही वाचा…सदावर्तेंकडून गोडसेचं उदात्तीकरण, “भाजपचा हात असल्याशिवाय अशी पिलावळ..,” वडेट्टीवारांची भाजपवर जोरदार टिका
हेही वाचा…“मलाही मुंबईत घर घेण्यास अडचण आली”, पंकजा मुंडेंनी सांगितल्या ‘त्या’ आठवणी