पुणे : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा पदभार इतर नेत्यांकडे सोपवावा, अशी मागणी भाजपकडून सातत्याने होत आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं आहे. पत्रकारांशी बोलताना राज्यातील निर्बंध आणि नियमावलीवर भाष्य करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे अनेकांचा काही काळ गोंधळ उडाला होता.
पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? अजितदादा म्हणतात… मी आणि वळसे पाटील…
पत्रकारांनी अजित पवार यांना राज्यातील नियम अधिक कठोर होणार का, असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी ‘जर ऑक्सिजनची मागणी वाढली तर निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील’, असं विधान पत्रकारांशी बोलताना केलं आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतल्यानं आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी हा उल्लेख जाणीवपूर्वक केला ही अनावधानानं केला, अशी आता कुजबूज राजकीय वर्तुळात ऐकू येतेय.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक; कडक निर्बंध लागणार? आज होणार निर्णय
पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कुणाकुणीची निवड केली, याबाबत माहिती देताना अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी महत्त्वाची विधानं केली आहे. बँका चालवणं हे तसं स्पर्धात्मक झालेलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, बँकेच्या वेगवेगळ्या पदांवर कोणाला कोणती जबाबदारी देण्यात आली आहे, याबाबत अजित पवार यांनी माहिती दिली. यानंतर अजित पवार यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सवाल करण्यात आला. राज्यातील निर्बंध आणखी वाढवले जाणार आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांनी विचारला. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की, नागरीकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं सुरु केलेली आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील.
Read also:
- तुम्ही कितीही करा हल्ला, पण मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला – महापौर किशोरी पेडणेकर
- आयुक्त इकबाल सिंह, यशवंत जाधव यांच्या रूपात महापालिकेत सचिन वाझे; आमदार अमित साटमांचा आरोप
- पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिगंबर दुर्गाडे; इच्छुकांना अजित पवारांना मोठा धक्का
- राजेश टोपेजी तुम्ही डॉक्टर आहात, मग इंदुरीकरांना दरवेळी का पाठीशी घालतायं? तृप्ती देसाई
- …तर प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही; आशिष शेलारांच मुख्यमंत्र्यांना प्रत्यूत्तर