पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. महापालिकेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनासह इतर प्रकल्पांचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील भाजप आमदार, पदाधिकारी कार्यक्रमावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अण्णा बनसोडे हे देखील यावेळी उपस्थित होते. बनसोडे यांच्या उपस्थितीने यावेळी अनेकांचे लक्ष वेधले.
हेही वाचा…कुरूलकरांचा थेट पाकिस्तानी तरूणीशी संबंध, ? ‘झारा दासगुप्ता’ नावाने बनावट खातं, नवी माहिती समोर
अण्णा बनसोडे हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याचा चर्चा आहे. राज्यातील सत्तापालटा पूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत देखील त्यांनी आपली नाराजी उघडपणे वक्त केली होती. तर मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत एकाच गाडीत प्रवास केल्याने मोठी चर्चा झाली होती.
हेही वाचा…“कारवाईला घाबरत नाही, लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला”, राऊतांनी सरकारला डिवचलं
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची उघड मागणी बनसोडे यांनी केली होती.
हेही वाचा…पुण्याचा शहाराध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत ठरणार, १८ मे रोजी पक्षांची कार्यकारिणी बैठक
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लढवले जाणारे तर्कवितर्क, आजच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्याशी दिसून आलेला बनसोडे यांचा संवाद, यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“लोकसभा अन् विधानसभा निवडणुका एकत्र होणार”, अजित पवारांचं आगामी निवडणुकांबाबत मोठं विधान
हेही वाचा…जयंत पाटलांना ईडीची दुसऱ्यांदा नोटीस, 22 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश
हेही वाचा…“भाजपला हरवायचं असेल तर आघाडीने असदुद्दीन ओवेसीचं नेतृत्व स्विकारावं,” इम्तियाज जलील
हेही वाचा…“तुंबवून ठेवलेल्या निवडणुका घ्याव्यात, कधीही घ्या,” राऊतांचं भाजपला आवाहन
हेही वाचा…“एक लेटर बॉम्ब अन् भाजपमध्ये प्रवेश, सुळेंचा निकवर्तीय, राष्ट्रवादीचा माजी आमदार उद्या भाजपमध्ये जाणार”