मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांना ईडीने दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे. त्यांना २२ मे रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधी जंयत पाटील यांना ईडीने शुक्रवारी १२ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
हेही वाचा…पुण्याचा शहाराध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत ठरणार, १८ मे रोजी पक्षांची कार्यकारिणी बैठक
आयएल अॅण्ड एफएस या कंपनीत गैरव्यवहार झाल्याचा इडीने ठपका ठेवला आहे. त्यानंतर या कंपनीच्या संबंधीत सगळ्यांना गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच कंपनीच्या संबंधी २०१९ साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता जंयत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशीसाठी येत्याा १२ मे रोजी बोलवलं होतं. पंरतु खासगी काम असल्याने जयंत पाटील यांनी इडीकडून चौकशीसाठी वेळ मागवून घेतला.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंसोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो”, गुलाबराव पाटलांंचं मोठं वक्तव्य
आयएल अॅण्ड एफएस या संस्थेशी माझा कोणताही संबध नाही. त्यांच्याकडे कधी कर्ज मागण्यासाठी गेलेलो नाही. आता नोटीस प्राप्त झाली आहे. तर चौकशीला सामोरा जाईन. पण सध्या जवळच्या लोकांची लग्न आहेत. त्यामुळे दोन-तीन दिवसांनी चौकशीसाठी येईनल असे पत्र ईडीला पाठविले आहे. ईडी नोटीस का पाठवते? हे देशाला माहिती आहे. त्यामुळे आत्ताच नोटीस का आली ? याचे मला आश्वार्च वाटत नाही. मला का लक्ष्य करण्यात आले? हे समजत नाही. अशीही प्रतिक्रिया जंयत पाटील यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपला हरवायचं असेल तर आघाडीने असदुद्दीन ओवेसीचं नेतृत्व स्विकारावं,” इम्तियाज जलील
हेही वाचा…“तुंबवून ठेवलेल्या निवडणुका घ्याव्यात, कधीही घ्या,” राऊतांचं भाजपला आवाहन
हेही वाचा…“एक लेटर बॉम्ब अन् भाजपमध्ये प्रवेश, सुळेंचा निकवर्तीय, राष्ट्रवादीचा माजी आमदार उद्या भाजपमध्ये जाणार”
हेही वाचा…कुरूलकरांचा थेट पाकिस्तानी तरूणीशी संबंध, ? ‘झारा दासगुप्ता’ नावाने बनावट खातं, नवी माहिती समोर
हेही वाचा…“कारवाईला घाबरत नाही, लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला”, राऊतांनी सरकारला डिवचलं