पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘मिशन बारामती’ लक्ष्य ठेवले आहे. त्या दृष्टीने भापजने मोठ्या हालचाली सुरू केल्या असून भाजपने पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडण्यास सुरूवात केली आहे. पुरंदरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा…“कर्नाटकच्या मतदारांनी भाजपच्या डोक्यात बजरंगबलीच्याच गदेने जोरदार प्रहार केला”
माजी आमदार अशोक टेकवडे हे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांवर नाराज असल्याने त्यांनी राष्ट्रवादीला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच त्यांनी मागच्या काही महिन्यात कार्यकर्त्यांवर नाराज असल्याचं एक पत्र पाठवत त्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्याच वेळी ते पक्ष बदलणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
हेही वाचा…“कर्नाटकातल्या जनतेने बंडखोरांना धडा शिकवला, भाजपात गेलेले १८ बंडखोर उमेदवार पराभूत”
अशोक टेकवडे यांनी एक जिल्ह्याध्यक्षांना कार्यकर्त्यांबाबत एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी पुरंदर तालुकाध्यक्षांची तक्रार करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच अध्यक्ष बदलण्याची मागणीही केली होती. या शिवाय राष्ट्रवादी काॅंग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला नाही. तो पदाधिकाऱ्यांचा पक्ष झाला असल्याची टिका करत पत्रावर कारवाई न झाल्याने ते दुखावले होते.
READ ALSO :
हेही वाचा…कुरूलकरांचा थेट पाकिस्तानी तरूणीशी संबंध, ? ‘झारा दासगुप्ता’ नावाने बनावट खातं, नवी माहिती समोर
हेही वाचा…“कारवाईला घाबरत नाही, लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला”, राऊतांनी सरकारला डिवचलं
हेही वाचा…पुण्याचा शहाराध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत ठरणार, १८ मे रोजी पक्षांची कार्यकारिणी बैठक
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंसोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो”, गुलाबराव पाटलांंचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…कर्नाटकात भाजपचा मोठा पराभव, मोदी अन् शहांनी दिल्या प्रतिक्रिया, म्हणाले, कर्नाटकाचा निकाल,,,,,