मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. कर्नाटक विधानसभा २२४ मतदार संघापैकी काॅंग्रेसने 128 जागांवर आघाडी घेतली असून सत्ता स्थापन केला जाणार असल्याचा दावा केला जात आहे. तर भाजपला या निवडणुकीत दारूण पराभवाचा सामाना करावा लागला आहे. यातच कर्नाटकात राजकीय घटनांना वेग आला असून काॅंग्रेसच्या उमेदवारांना बंगळरूत हालवण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा…“अन् राष्ट्रवादीचा उमेदवार पॅक करून महाराष्ट्रात पाठवला,” फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला
श्री बजरंगबलीच्या नावाने समाजात फुट पाडणाऱ्या भाजपच्या डोक्यात कर्नाटकच्या मतदारांनी लोकशाहीच्या मार्गाने श्री बजरंगबलीच्याच गदेने जोरदार प्रहार केला. श्री बजरंगबली म्हणजे अपार श्रध्दा, अफाट ताकद, परम निष्ठा आणि मुत्सदेगिरीचं प्रतिक, प ण भाजपने केवळ राजकीय स्वार्थासाठी धार्मिक अंगाने श्री बजरंगबलीला प्रचारात ओढल्यानेच भाजपचा कर्नाटकात दारून पराभव झाला. अशी टिका रोहित पवारांनी केली आहे.
हेही वाचा…सत्ता कुणाचीही असो मंत्रीपद घरात येतोच, कर्नाटकच्या निवडणुकीत ‘पाच भाऊ’ आमदारांची चर्चा
पुझे बोलतांना ते म्हणाले की, सर्वसमावेश भूमिका घेऊन एकजुटीने रणांगणात उतरलं तर कितीही बलाढ्य शक्ती असली तरी तिला आपण हरवू शकतो, हा संदेशही कर्नाटकच्या या निकालाने भाजप विरोधी पक्षांना दिला आहे. असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“कर्नाटकातील विजय हा २०२४ च्या निवडणुकीतील पहिले पाऊल, 2024 साली राहूल गांधी पंतप्रधान होणार”?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारून पराभव होण्याच्या मार्गावर आहे. कर्नाटक विधानसभा २२४ मतदार संघापैकी काॅंग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून आतापर्यंत १२५ जागांवर काॅंग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप ७०, जेडीएस २२ आणि इतर ७ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजपचा सुपडा साफ केला आहे.
श्री बजरंगबलीच्या नावाने समाजात फूट पाडणाऱ्या भाजपच्या डोक्यात कर्नाटकच्या मतदारांनी लोकशाहीच्या मार्गाने श्री बजरंगबलीच्याच गदेने जोरदार प्रहार केला. श्री बजरंगबली म्हणजे अपार श्रद्धा, अफाट ताकद, परम निष्ठा आणि मुत्सद्देगिरीचं प्रतिक…. पण भाजपने केवळ राजकीय स्वार्थासाठी… pic.twitter.com/3qnq3POKgv
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 13, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“कर्नाटकातल्या जनतेने बंडखोरांना धडा शिकवला, भाजपात गेलेले १८ बंडखोर उमेदवार पराभूत”
हेही वाचा…“कर्नाटक में नफरत का बाजार बंद हुआ और मोहब्बत की दुकान खुली है”, राहुल गांधी
हेही वाचा…“कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या ‘खरेदी विक्री’च्या धोरणाला मुठमाती दिली,” राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…“एकत्र लढलो तर राज्यात आघाडीची सत्ता येईल”, कर्नाटकच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“मोदी-शहांच्या बळजबरी सत्तेच जोखडं कर्नाटकच्या जनतेनं निर्भयपणे फेकलं”, ठाकरेंचा हल्लाबोल