मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा दारूण पराभव करत १३२ जागांवर मोठा विजय मिळवला आहे. परंतु या सर्व निवडणुकीत निपाणीतील मतदार संघ राज्याच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरला. या मतदारसंघासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये चुरस बघायला मिळाली. याठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचार केला होता. मात्र येथे भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.
हेही वाचा…कर्नाटक विधानसभा निवडणुक निकाल..! “द्वेषाचं दुकान फार काळ चालणार नाही, हा मोदीजींचा पराभव”
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात असलेल्या निपाणी मतदार संघात तिरंगी लढत बघायला मिळाली. मात्र येथे भाजपचे उमेदवार शशिकला जोल्ले ७२, ९५२ मतांनी विजयी झाल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव पाटील यांना ६५,६१४ मत मिळाली आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर काॅंग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांना ४३, ९३२ मत पडली आहेत.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’ – फडणवीसांची उपस्थिती, महेश लांडगेंची वचनपूर्तीच्या दिशेने वाटचाल
निपाणी मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी देवेंद्र फडणवीस, शरद पवार मैदानात उतरले होते. कुणाचं पार्सल परत महाराष्ट्रात पाठवणार यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. मात्र याठिकाणी देवेंद्र फडणवीस शरद पवारांवर वरचढ ठरले. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचा उमेदवार पॅक करून परत पाठवा असंं मी निपाणीच्या लोकांना अगोदरच सांगितलं होतं. माझं मत निपाणीच्या लोकांनी ऐकलं अन् पवार साहेबांचा उमेदवार पॅक करून परत पाठवला. असा टोलाही त्यांनी शरद पवारांना लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…सत्ता कुणाचीही असो मंत्रीपद घरात येतोच, कर्नाटकच्या निवडणुकीत ‘पाच भाऊ’ आमदारांची चर्चा
हेही वाचा…“कर्नाटकातील विजय हा २०२४ च्या निवडणुकीतील पहिले पाऊल, 2024 साली राहूल गांधी पंतप्रधान होणार”?
हेही वाचा…कर्नाटकात काॅंग्रेसची ताकद..! एकही दिवस प्रचार न करता काॅंग्रेसचा उमेदवार विजयी
हेही वाचा…“कर्नाटकात ८४ % हिंदू व फक्त १२ % मुस्लिम, भाजपचे मुस्लिमद्वेषी हिंदूत्व हिंदू जनतेने नाकारले”
हेही वाचा…किशोर आवारेंची हत्या, सुनील शेळकेंनी आरोप फेटाळले, चौकशीला तयार, सुत्रधार शोधा