नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता गमावत काॅंग्रेसने भाजपच्या कमळावर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काॅंग्रेसने एकहाती सत्ता मिळवत २२४ मतदारसंघापैकी १३३ मतदारसंघावर काॅंग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजपने 67 जागावर आघाडी घेतली आहे. त्यामुळे कर्नाटकात काॅंग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. यातच कर्नाटकात प्रत्येक निवडणुकीत चर्चेत राहणारे जारकीहोळी बंधूचा करिष्मा पुन्हा एकदा कर्नाटकात दिसला आहे.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’ – फडणवीसांची उपस्थिती, महेश लांडगेंची वचनपूर्तीच्या दिशेने वाटचाल
महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात जारकीहोळी बंधूंचा मोठा दबदबा आहे. बेळगावचे राजकारण जारकीहोळी बंधूंभोवती फिरत राहते, यंदा देखील जारकीहोळी बंधूंचेच वर्चस्व कायम राहिले आहे. अरभावी मतदारसंघातून भाजपचे बालचंद्र जारकीहोळी विजयी झाले आहेत. त्यामुळे सत्ता कोणाचीही असो जारकीहोळी यांच्या घरात मंत्रीपदाचा लाल दिवा येतोच असं बोललं जात आहे.
हेही वाचा…“महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मेहनत घेतली, तर २०२४ मध्ये महाराष्ट्रातील भाजपची घाण साफ होईल”
दुसरे भाऊ रमेश लक्ष्मणराव जारकीहोळी हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. 1999 पासून लागोपाठ त्यांनी विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. रमेश जारकीहोळी यांनीच कर्नाटकातील जेडीएस – काँग्रेस सरकार उलथवून लावण्यात मोठी भूमिका निभावली होती.तिसरे भाऊ सतीश जारकीहोळी हे बेळगाव जिल्ह्यातील यमकरमर्डी मतदारसंघातून पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. सतीश जारकीहोळी यांनी भाजपचे उमेदवार बसवराज हुंद्री यांचा पराभव केला आहे.
हेही वाचा…निपाणीत कुणाचं पार्सल परत जाणार, शरद पवार की फडणवीस, ? राष्ट्रवादी अन् भाजपात काटे की टक्कर
जारकीहोळी परिवारातील हे पाच भाऊ असून त्यापैकी चार सक्रिय राजकारणात आहेत. त्यापैकी दोन भाऊ रमेश आणि बालचंद्र जारकीहोळी हे भाजपमध्ये तर दोन भाऊ लखन आणि सतीश जारकीहोळी काँग्रेसमध्ये आहेत. पाचवा भाऊ भिमाशी, जो राजकीय गुंडगिरीसाठी ओळखला जातो. बेळगावचे राजकारण या पाच भावांभोवतीच फिरत राहते.
READ ALSO :
हेही वाचा…“कर्नाटकातील विजय हा २०२४ च्या निवडणुकीतील पहिले पाऊल, 2024 साली राहूल गांधी पंतप्रधान होणार”?
हेही वाचा…कर्नाटकात काॅंग्रेसची ताकद..! एकही दिवस प्रचार न करता काॅंग्रेसचा उमेदवार विजयी
हेही वाचा…“कर्नाटकात ८४ % हिंदू व फक्त १२ % मुस्लिम, भाजपचे मुस्लिमद्वेषी हिंदूत्व हिंदू जनतेने नाकारले”
हेही वाचा…किशोर आवारेंची हत्या, सुनील शेळकेंनी आरोप फेटाळले, चौकशीला तयार, सुत्रधार शोधा
हेही वाचा…कर्नाटक विधानसभा निवडणुक निकाल..! “द्वेषाचं दुकान फार काळ चालणार नाही, हा मोदीजींचा पराभव”