नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता गमावत काॅंग्रेसने भाजपच्या कमळावर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काॅंग्रेसने एकहाती सत्ता मिळवत २२४ मतदारसंघापैकी १३३ मतदारसंघावर काॅंग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजपने 67 जागावर आघाडी घेतली आहे. त्यामुळे कर्नाटकात काॅंग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. यातच काॅंग्रेसच्या नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा…“महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मेहनत घेतली, तर २०२४ मध्ये महाराष्ट्रातील भाजपची घाण साफ होईल”
कर्नाटकमध्ये निवडणुकीत एकीकडे भांडवलशहांची ताकद होती आणि दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. गरीबांच्या शक्तीने भांडवलशहांना पराभव केला. कर्नाटकची जनता, कार्यकर्ते आणि नेत्यांचे अभिनंदन. असं म्हणत राहुल गांधी यांनी कर्नाटक विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच कर्नाटकात नफरत की बाजार में मोहब्बत की दुकाने खुली झाली आहेत. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…निपाणीत कुणाचं पार्सल परत जाणार, शरद पवार की फडणवीस, ? राष्ट्रवादी अन् भाजपात काटे की टक्कर
यातच आता २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यावर काॅंग्रेसचे नेते आणि विजयी उमेदवार सिद्धारामय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीतील विजय हा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे पहिले पाऊल आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधान होणार आहे. असं सिद्धारामय्या यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“मोदींच्या तब्बल १९ जाहीर सभा, ७ रोड शो,” तरीही कर्नाटकात भाजपला दणका, काॅंग्रेस सरकार स्थापन करणार ?
तर लोकांच्या मतदानाच्या हक्काचा आदर करा. विरोधी पक्षाची भूमिका बजावू. कार्यकर्त्यांसोबत बसून जिथे चूक झाली तिथे विचारमंथन करू. भाजप कार्यकर्त्यांनी पुर्ण प्रमाणिकपणे आणि मेहनतीने काम केले आहे. असं भाजप नेते बी. एस, येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कर्नाटकात काॅंग्रेसची ताकद..! एकही दिवस प्रचार न करता काॅंग्रेसचा उमेदवार विजयी
हेही वाचा…“कर्नाटकात ८४ % हिंदू व फक्त १२ % मुस्लिम, भाजपचे मुस्लिमद्वेषी हिंदूत्व हिंदू जनतेने नाकारले”
हेही वाचा…किशोर आवारेंची हत्या, सुनील शेळकेंनी आरोप फेटाळले, चौकशीला तयार, सुत्रधार शोधा
हेही वाचा…कर्नाटक विधानसभा निवडणुक निकाल..! “द्वेषाचं दुकान फार काळ चालणार नाही, हा मोदीजींचा पराभव”
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’ – फडणवीसांची उपस्थिती, महेश लांडगेंची वचनपूर्तीच्या दिशेने वाटचाल