मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २२४ मतदारसंघापैकी १३४ मतदार संघात काॅंग्रेसने बहुमताची आघाडी घेतली असून भाजपची सत्ता काॅंग्रेसने हिसकावून घेतली आहे. या निवडणुकीत भाजपचे ६७, तर जेडीएसचे १९ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजपला मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा…निपाणीत कुणाचं पार्सल परत जाणार, शरद पवार की फडणवीस, ? राष्ट्रवादी अन् भाजपात काटे की टक्कर
यातच धारवाड मतदार संघात काॅंग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी यांनी एकही दिवस प्रचार न करताही ते निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्यावर निवडणुकीआधी जिल्हाबंदी घालण्यात आली होती. त्यांना विनय कुलकर्णी यांना धारवाड जिल्हाबंदी करण्यात आल्याने त्यांनी या मतदारसंघात एकही दिवस प्रचार केला नव्हता. मात्र, त्यांच्यावर जिल्ह्यांबदीची कारवाई करण्यात आल्याने त्यांना निवडणुकीदरम्यान आपल्या मतदारसंघात जाता आले नाही. त्यामुळे त्यांची पत्नी, परिवाराने व कार्यकर्त्यांनी त्यांच्यातर्फे प्रचार मोहीम राबवली. त्यामुळे विनय कुलकर्णी हे निवडून येणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. परंतु त्यांनी यावेळी विजय संपादन केलं आहे.
हेही वाचा…“मोदींच्या तब्बल १९ जाहीर सभा, ७ रोड शो,” तरीही कर्नाटकात भाजपला दणका, काॅंग्रेस सरकार स्थापन करणार ?
दरम्यान, कर्नाटक काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष दिनेश राव हे बेंगळुरू शहरातील गांधीनगरात अवघ्या ११५ मतांनी विजयी झाले आहेत. याच जागेवरून त्यांचा हा सलग सहावा विजय आहे आणि यावेळी हा विजय सर्वात कठीण देखील होता. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सप्तगिरी गोवडा यांना 53, 867 तर दिनेश राव यांना 53, 980 मत घेऊन विजयी झाले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“कर्नाटकात ८४ % हिंदू व फक्त १२ % मुस्लिम, भाजपचे मुस्लिमद्वेषी हिंदूत्व हिंदू जनतेने नाकारले”
हेही वाचा…किशोर आवारेंची हत्या, सुनील शेळकेंनी आरोप फेटाळले, चौकशीला तयार, सुत्रधार शोधा
हेही वाचा…कर्नाटक विधानसभा निवडणुक निकाल..! “द्वेषाचं दुकान फार काळ चालणार नाही, हा मोदीजींचा पराभव”
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’ – फडणवीसांची उपस्थिती, महेश लांडगेंची वचनपूर्तीच्या दिशेने वाटचाल
हेही वाचा…“महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मेहनत घेतली, तर २०२४ मध्ये महाराष्ट्रातील भाजपची घाण साफ होईल”