मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. कर्नाटक विधानसभा २२४ मतदार संघापैकी काॅंग्रेसने 128 जागांवर आघाडी घेतली असून सत्ता स्थापन केला जाणार आहे. कर्नाटकात भाजपची सत्ता गेल्यानंतर त्यांच्यावर आता राजकीय वर्तुळातून जोरदार टिका केली जात आहे. त्यानंतर आता या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा…“मोदी-शहांच्या बळजबरी सत्तेच जोखडं कर्नाटकच्या जनतेनं निर्भयपणे फेकलं”, ठाकरेंचा हल्लाबोल
कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्या सर्वांचे आभार मानतो. या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो. आगामी काळात आम्ही कर्नाटकची सेवा आणखी जोमाने करू. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅंग्रेसचे देखील अभिनंदन केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेस पक्षाच्या विजयबद्दल त्यांचे अभिनंदन. लोकांच्या आकांक्षा पुर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना सुभेच्छा असं मोदींनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“अन् राष्ट्रवादीचा उमेदवार पॅक करून महाराष्ट्रात पाठवला,” फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला
दरम्यान, या निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देखील याबाबत मतदारांचे आभार मानले आहेत. भाजपला इतकी वर्ष सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल कर्नाटकच्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप कर्नानटकातील लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. असंही त्यांनी म्हटलं आहे.
I thank all those who have supported us in the Karnataka elections. I appreciate the hardwork of BJP Karyakartas. We shall serve Karnataka with even more vigour in the times to come.
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2023
My sincere gratitude to the people of Karnataka for giving the BJP the opportunity to serve them for so many years. The BJP under the leadership of PM @narendramodi Ji will continue to strive for the welfare and development of the people of Karnataka.
— Amit Shah (@AmitShah) May 13, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“कर्नाटकच्या मतदारांनी भाजपच्या डोक्यात बजरंगबलीच्याच गदेने जोरदार प्रहार केला”
हेही वाचा…“कर्नाटकातल्या जनतेने बंडखोरांना धडा शिकवला, भाजपात गेलेले १८ बंडखोर उमेदवार पराभूत”
हेही वाचा…“कर्नाटक में नफरत का बाजार बंद हुआ और मोहब्बत की दुकान खुली है”, राहुल गांधी
हेही वाचा…“कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या ‘खरेदी विक्री’च्या धोरणाला मुठमाती दिली,” राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…“एकत्र लढलो तर राज्यात आघाडीची सत्ता येईल”, कर्नाटकच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया