पुणे : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने मोठी रणनीती आखली आहे. कसबा पोट निवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. यातच भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष जगदीश मुळीक यांचा कार्यकाळ देखील संपत आला आहे. त्यामुळे पुणे भाजपमध्ये मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्ष मेळावा होणार आहे.
हेही वाचा…“कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या ‘खरेदी विक्री’च्या धोरणाला मुठमाती दिली,” राष्ट्रवादीने डिवचलं
केंद्रीय मंत्री अमित शहा १८ मे रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याच्या वेळी अमित शहा युवा संवादानिमित्ताने युवकांशी चर्चा करणार आहे. त्यांनंतर त्यांच्या उपस्थितीत राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची पुण्यातील बालगंधर्व सभा गृहात कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्वच भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
हेही वाचा…“एकत्र लढलो तर राज्यात आघाडीची सत्ता येईल”, कर्नाटकच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
दरम्यान, अमित शहा यांच्या उपस्थित भाजपचा नवीन शहाराध्यक्ष देखील निवडला जाण्याची शक्यता आहे. कसबा पेठेतील पराभवानंतर कर्नाटकात सत्ता गमवावी लागल्याने भाजपचे प्रदेश नेतृत्व अस्वस्थ झाले आहे. पुण्यासारख्या शहरात पक्षाचे खंबीर नेतृत्व असण्याची निकड त्यांना प्रकर्षाने जाणवू लागली आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठई चर्चेतील स्थानिक नेत्यांऐवजी वेगळाच चेहरा समोर येण्याची शक्यताही कार्यकर्यांत चर्चिली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंसोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो”, गुलाबराव पाटलांंचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…कर्नाटकात भाजपचा मोठा पराभव, मोदी अन् शहांनी दिल्या प्रतिक्रिया, म्हणाले, कर्नाटकाचा निकाल,,,,,
हेही वाचा…“कर्नाटकच्या मतदारांनी भाजपच्या डोक्यात बजरंगबलीच्याच गदेने जोरदार प्रहार केला”
हेही वाचा…“कर्नाटकातल्या जनतेने बंडखोरांना धडा शिकवला, भाजपात गेलेले १८ बंडखोर उमेदवार पराभूत”
हेही वाचा…“कर्नाटक में नफरत का बाजार बंद हुआ और मोहब्बत की दुकान खुली है”, राहुल गांधी