मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीत अजित पवार यांनी देखील बंड पुकारून सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता अनेक कार्यकर्ते पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच काल राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हेही वाचा…“वेळ आल्यास राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार,” उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र येणार ? चर्चांना उधाण
मुंबईतील विक्रोळी टागोर नगर विभागाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखाप्रमुख राजेश सोनवळे यांनी काल आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या धारावी येथील माजी नगरसेविका रेश्मा बानो वकील शेख आणि जोगेश्वरी येथील माजी नगरसेविका नाजिया सोफिया यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक तसेच राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा…“आम्ही सत्य, लोकशाही आणि संविधानासाठी लढत राहू”
दरम्यान, अजित पवारांनी देखील महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महायुतीची ताकद वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटासोबत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आगामी निवडणुका एकत्रित लढण्याची शक्यता आहे.
लोकप्रतिनिधींचा जाहीर पक्षप्रवेश | मुंबई https://t.co/5E6DYFVAkQ
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीने भाजपशी कितीही सलगी वाढवली तरी भ्रष्टाचारच्या आरोपातून मुक्त होता येणार नाही”
हेही वाचा…“पक्ष संपल्यावर का होईना मुंबईकर आणि राज्यातील जनतेबद्दल पाझर फुटू लागला”, मनसेंनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“राज ठाकरे फोन उचलणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात कसं आलं ? “
हेही वाचा…अंबादास दानवेंसोबतच्या राड्यानंतर भूमरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आवाज वाढला कारण..”
हेही वाचा…आदित्य ठाकरेंनी आणखी एक घोटाळा बाहेर काढला, खोके सरकार म्हणत टिकाही केली