मुंबई : राज्यात पक्ष फुटीप्रकरणानंतर आता राजकीय मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्रित आगामी निवडणुका लढवाव्या, अशा चर्चा सुरू होत्या. त्यातच आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंशी चर्चा करण्यास तयार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…भुजबळानंतर शरद पवारांच्या निशाण्यावर आता दुसरा मंत्री, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात पवारांची दुसरी सभा
दादरमधील महापौर निवासस्थानाच्या जागेत होत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाबाबत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याची माहिती समोर येत आहे. वेळ आल्यास राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार आहे. असं उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे म्हटलं असल्याचं सुत्रांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा…देशातील सर्व विरोधक मुंबईत एकवटणार, महाविकास आघाडीच्या ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी
दरम्यान, शिवसेनानंतर राष्ट्रवादीत देखील बंडाळी झाल्याने राज्यातील अनेक राजकीय गणित बदलली आहेत. यातच मुंबई महानगरपालिका जिंकण्याचे लक्ष भाजपने ठेवले आहे. यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा पुन्हा फडकणार असल्याची चर्चा रंगली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आम्ही सत्य, लोकशाही आणि संविधानासाठी लढत राहू”
हेही वाचा…अंबादास दानवे, सत्तार अन् भुमरे यांच्यात जोरदार राडा, बैठकीत मोठा गोंधळ
हेही वाचा…“देशपातळीवर नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय मला दिसत नाही”, अजित पवार
हेही वाचा…राहुल गांधी संसदेत पुन्हा परतले, मोदी-शहांना राहुल गांधींची भिती
हेही वाचा…“तोवर तुम्ही औरंग्या, अफजल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा”