मुंबई : घटनाबाह्य खोके सरकारने मुंबईकरांना लुटण्याचा सपाटाच लावलाय. असं म्हणत शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील आणखी एक घोटाळा बाहेर काढला आहे. मुंबई महानगरपालिकेवर पुर्व आणि पश्चिम महामार्गांच्या देखभालीची जबाबदारी टाकल्यावरही टोल मात्र एमएसआरडीसी मार्फत घेतला जात असल्याचा आरोप ठाकरेंनी लावला आहे.
हेही वाचा…“तोवर तुम्ही औरंग्या, अफजल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा”
आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना एक पत्र देखील पाठवलं आहे. घटनाबाह्य खोके सरकारने मुंबईकरांना लुटण्याचा सपाटाच लावलाय! आता तर मुंबई महानगरपालिकेवर पूर्व आणि पश्चिम महामार्गांच्या देखभालीची जबाबदारी टाकल्यावरही टोल मात्र MSRDC मार्फत घेतला जातोय, शिवाय मुंबईचा स्ट्रीट टॅक्स आहेच. हा दुहेरी टॅक्स मुंबईकरांनी का भरावा? त्यातच मुंबईच्या महामार्गांवरच्या होर्डिंग्सचा महसुल मात्र मुंबई महानगरपालिकेला मिळत नाहीये. आज ह्याच विषयावर पत्रकार परिषद घेतली आणि मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून काय काय मागण्या केल्या ह्याची माहिती दिली. आम्ही सत्तेत आल्यावर मुंबईकरांची ह्या अन्यायकारक टोलपासून सुटका करणारच! पण आत्ताच्या सरकारकडून मुंबईकरांना लुटण्याचा जो खेळ चाललाय त्याचा पर्दाफाश केला. असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
हेही वाचा…भुजबळानंतर शरद पवारांच्या निशाण्यावर आता दुसरा मंत्री, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात पवारांची दुसरी सभा
दरम्यान, मुंबईच्या प्रवेशद्वारांवरचे टोलनाके सध्या प्रदुषण, वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यव्य आणि मनस्ताप ह्यांचे घाणेरडे जाळे होऊन बसले आहेत. ज्याचा त्रास मुंबईकरांना होत आहे. त्यांचा वेळ शक्ती आणि पैसा वाया जात आहे. ह्या सगळ्या महत्वाचा प्रश्न असा की, केंद्र आणि राज्य सरकारच्या महसुलात अगोदरच सर्वाधिक योगदान देणाऱ्या मुंबईकारांवर दोनदा कर आकारून अन्याय का केला जातो. असा सवाल देखील ठाकरेंनी केला आहे.
घटनाबाह्य खोके सरकारने मुंबईकरांना लुटण्याचा सपाटाच लावलाय!
आता तर मुंबई महानगरपालिकेवर पूर्व आणि पश्चिम महामार्गांच्या देखभालीची जबाबदारी टाकल्यावरही टोल मात्र MSRDC मार्फत घेतला जातोय, शिवाय मुंबईचा स्ट्रीट टॅक्स आहेच.
हा दुहेरी टॅक्स मुंबईकरांनी का भरावा?त्यातच मुंबईच्या… pic.twitter.com/RWimNzOWMc
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“वेळ आल्यास राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार,” उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र येणार ? चर्चांना उधाण
हेही वाचा…“आम्ही सत्य, लोकशाही आणि संविधानासाठी लढत राहू”
हेही वाचा…अंबादास दानवे, सत्तार अन् भुमरे यांच्यात जोरदार राडा, बैठकीत मोठा गोंधळ
हेही वाचा…“देशपातळीवर नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय मला दिसत नाही”, अजित पवार
हेही वाचा…राहुल गांधी संसदेत पुन्हा परतले, मोदी-शहांना राहुल गांधींची भिती