नागपूर: महानगरपालिका निवडणुकाला सहा महिने बाकी आहे. म्हणूनच नगरसेवक लसीकरण केंद्रातून प्रचाराची संधी सोडत नाहीत. काँग्रेसच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी नागपुरातील काही लसीकरण केंद्रांवर भाजपाचे बॅनर लावल्याची तक्रार केली. त्यानंतर आढावा बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना फोन लावला. त्यांनी बॅनर्स काढण्याच्या सूचना दिल्या.
हे पण वाचा: “कुठेही गेलं तर जनतेचं ऐकून घ्यायचं असतं”, राष्ट्रवादीकडून शिवसेनेला घरचा आहेर
गेल्या १५ वर्षांपासून नागपूर महापालिकेत भाजपा सत्तेत आहे. मात्र, आता निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कामाला सुरुवात केली आहे. भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेससुद्धा मैदानात उतरले आहेत. लसीकरण केंद्रांवर बॅनरबाजीवरून काँग्रेस-भाजप आमनेसामने आली आले आहे. काँग्रेसने महापालिका निवडणूकीची तयारी जोरदार सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आढावा बैठक घेतली. यावेळी नाना पटोले यांनी भाजपाला टक्कर देण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले.
हे पण वाचा: राज्यातल्या भाजपच्या “या” मोठ्या नेत्याचा, झारखंड सरकार पाडण्याच्या कटात हात!
महापालिकेतील भाजपाची सत्ता पलटवण्यासाठी काँग्रेसने जोर लावायला सुरुवात केली आहे. आढावा बैठकीत बोलताना पटोलेंनी पक्षाने आदेश दिल्यास नागपूर दक्षिण-पश्चिममधून लढेन, असे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ विरोधी पक्षांचा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पटोले-फडणवीसांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली आहे. फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून पटोले यांनी आढावा बैठकी घ्यायला सुरुवात केली आहे. म्हणजेच राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या मतदारसंघातूनच भाजपाला हादरे देण्याची व्यूव्हरचना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आखली असल्याचे समजते.
हे पण वाचा: विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावणार?
भाजपला हादरे देण्याची काँग्रेसची व्यूव्हरचना
पहिल्या दिवशी नागपुरातील तीन विधानसभा मतदारसंघात आढावा बैठकीचं नियोजन करण्यात आलं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण – पश्चिम मतदारसंघातून नाना पटोले यांनी आढावा बैठकी घ्यायला सुरुवात केली आहे. म्हणजेच राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या मतदारसंघातूनच भाजपला हादरे देण्याची व्यूव्हरचना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आखल्याचं पाहायला मिळत आहे.
Read Also :
- नागपूर महापालिका: ‘तुम्हीच उमेदवार ठरवा, आता गटबाजी खपवून घेणार नाही’ – नाना पटोले
- आपले राज्य, आपले सरकार यांच्यावर विश्वास न ठेवणाऱ्या विरोधी पक्षाविषयी काय बोलावे
- भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात….
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाड दौऱ्यावर, तळीये ग्रामस्थांची करणार विचारपूस
- आपत्तीग्रस्तांना पुनर्वसनासाठी तातडीने मदत करा, केवळ इच्छाशक्ती दाखवून चालणार नाही, राज्य सरकारकडे दरेकरांची मागणी