मुंबई : महाराष्ट्रातील मशिदीवरील भोंग्याबाबतचा वाद आता शेजारील कर्नाटकमध्ये देखील गेला आहे. मशिदीवरील भोंग्यांबाबत सरकार भूमिका घेण्यास सक्षम नसल्याने कर्नाटकमधील 1 हजार हनुमान मंदिरावर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा, ओंकार, भक्तीगीते लावण्यात येतील , असा इशारा श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे. त्यावरून काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मनसे आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.
तो पोपटासारखा बोलतो, त्याला कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद देऊ नका? बापटांची शरद पवारांसमोर फटकेबाजी
केवळ मनसेला महाराष्ट्र दिसतो परंतु भाजपा शासित शेजारचा कर्नाटक का दिसत नाही ? श्रीराम सेनेसोबत मनसेने तेथील आंदोलनात सहभागी व्हावे. फडणवीस साहेबांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंची हातभर का पायभर फाटली तेही स्पष्ट करावे. मनसे व भाजपा महाराष्ट्र बदनाम करत आहेत हे स्पष्ट आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
“वसंत, तु मिसळ महोत्सव घे, मी येतो”; राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिला शब्द
कोणतीही विश्वासार्हता नसणाऱ्यांना पुढे करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करतात येईल हा भाजपाचा गैरसमज आहे. सरकार पडत नाही या भावनेने वैफल्यग्रस्त भाजपा नेत्यांना विकृत आनंद मिळत असेल दिवसभर वृत्तवाहिन्या दाखवतात. त्यांना पाहून आघाडीसाठी जनतेचा पाठिंबा वाढतच आहे. जनतेसाठी ही मंडळी जोकरच आहेत. अशी प्रखर टिका देखील त्यांनी केली आहे.
“राज्य आता पवारांपासून वाचवण्याची वेळ आलीय”; सदाभाऊ खोतांची राष्ट्रवादीवर जोरदार टिका
दरम्यान, कर्नाटकमध्ये सध्या भाजपचे सरकार असून मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आहेत. त्यावरून काॅंग्रेसने भाजपवर टिका केली आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबतची घेतलेली भूमिका सध्या देशभरात चर्चत आली आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंगेे खाली उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
Read also:
- राणांच्या एमआरआयच्या फोटोवरून सेनेचा रूग्णालयात राडा; किशोरी पेडणेकर, कायंदेंचा लीलावतीमध्ये ठिय्या
- संजय राऊत यांचे ‘टॉयलेट’ घोटाळा प्रकरण; किरीट सोमय्या यांच्या पत्नीची अब्रुनुकसानीची तक्रार
- संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर नवा आरोप; म्हणाले, किरीट का कमाल.. आप क्रोनोलॉजी समजीए!
- NIA ने दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्या आवळल्या; अन् सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना अटक करण्यात व्यस्त
- नवनीत राणा दिल्लीकडे रवाना; केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार