मुंबई : वकिल गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या काळातील एसटी आंदोलनात वकिलाचे कपडे घालून नाचल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. काऊंसिल ऑफ महाराष्ट्राला याबाबत तक्रार दाखल झाली होती. त्यावरुन गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द करण्यात आली आहे.
हेही वाचा…“वज्रमूठ महाविकास आघाडीची..! आघाडीच्या पहिल्या सभेचा थरकाप उडवणारा टिझर जारी, राजकारण तापणार ?
महाराष्ट्र एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी आघाडीच्या काळात आंदोलन पुकारलं होतं. त्या आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आपला पाठिंबा दिला होता. याच वेळी त्यांनी वकिलांचा ड्रेस घालून आझाद मैदानात नाच केला होता. त्यानंतर वकिल सुशील मंचरकर यांनी याबाबत काऊंसिल ऑफ महाराष्ट्रला तक्रार दिली होती.
हेही वाचा…““आई आजारी होती तरी ती सगळ्या कार्यक्रमांना जात होती”, कुणाल टिळकांनी दाखवला चंद्रकांत पाटलांना ‘ग्राउंड रिझल्ट’
गुणरत्न सदावर्ते यांची वकिलांची सनद रद्द झाल्यानंतर त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यावर खोचक टोला हाणला आहे. ते म्हणाले की, वकिलीपेक्षा चमचेगिरी जास्त केली तर माणसाला माननीय न्यायालय डंके की चोट पे नाचायला लावते याचा प्रत्यय आला.माननीय उच्च न्यायालयाचे आभार डंकेकीचोटपे अस पण त्यांनी म्हटलं आहे.
वकिली पेक्षा चमचेगिरी जास्त केली तर माणसाला माननीय न्यायालय “डंके की चोट’ पे नाचायला लावते याचा आज प्रत्यय आला. माननीय उच्च न्यायालयाचे आभार #डंकेकीचोटपे
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 28, 2023
Read also
हेही वाचा…“कसब्याचा पराभव हा पराभव नाही..आम्ही कसबा पुन्हा जिंकणारच”, चंद्रकांत पाटील
हेही वाचा…“७२ कोटी रुपयांतून शिरसाठांना ब्लॅकमेल करत पाच कोटी रुपये मागणारी जीवाभावाची बाई कोण?” रूपाली पाटलांचा सवाल
हेही वाचा…चंद्रकांत पाटलांचा ते विधान, त्यावर कुणाल टिळकांचं प्रत्युत्तर म्हणाले, “माझी आई..”
हेही वाचा…“सरकार पाडण्यासाठी शिंदे, फडणवीस आणि मी आमदारांच्या १५० बैठका घेतल्या,” आमदाराचा मोठा गोप्यस्फोट
हेही वाचा…“संजय शिरसाट नावाच्या लिंग पिसाटाचे कान टोचणे बाबत..”, रूपाली पाटलांचा शिरसाठांवर हल्लाबोल