पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी नगरसेवकांची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या नगरसेवकांची अशा प्रकारे हत्या करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगल्या आहेत.
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काॅंग्रेस अलर्ट मोडवर, सगळ्या काॅंग्रेस नेत्यांना दिल्लीत बोलवलं
जेजुरी येथील माजी नगरसेवक मेहबुब पानसरे यांची शुक्रवारी हत्या करण्यात आली आहे. त्यांच्यावर काही व्यक्तींनी कोयता आणि कुऱ्हाडीने वार करण्यात आले. मेहबुब पानसरे यांच्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर ते रक्ताच्या थोराळ्यात कोसळले, हल्ल्याची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान, त्यांचा रात्री मृत्यू झाला.
हेही वाचा…“जयंत पाटलांवर अपात्रतेची कारवाई करणार नाही,” अजित पवार गटाचा मोठा निर्णय
मेहबुब पानसरे यांच्यावर हल्ला प्रकरणात पाच ते सहा आरोपींचा सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. जेजूरी पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पानसरे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी नगरसेवक होते. तसेच, व्यावसायिक म्हणूनही त्यांचा नावलौकीक होता. अधिक तपास जेजूरी पोलीस करीत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली त्यांच्या कर्माने, पण आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांचा टाहो भाजपच्या नावाने का?
हेही वाचा…शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णया वेग, नार्वेकरांची सेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर दोन खासदारांमध्ये जुंपली, कोल्हे-आढळराव पाटील एकमेकांत भिडले..!
हेही वाचा…“ज्या दिवशी मंत्रिपद मिळालं, तेव्हा आई शेतात काम करीत होती,” राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना
हेही वाचा…” राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रात विधानसभेच्या ४०० तर लोकसभेच्या १०० जागा करून टाका”