नांदेड: नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर MLA Raosaheb Antapurkar यांचे कोरोना संसर्गामुळे नुकतेच निधन झालेले आहे. याठिकाणी आता लवकरच पोटनिवणूक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. भारतीय जनता पक्ष आता या मतदारसंघात ऍक्शन मोड मध्ये आलेला आहे आणि ठिकठिकाणी छुप्या बैठका देखील सर्व पक्षांकडून सुरु झालेल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड चे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा हा बालेकिल्ला आहे. आता काँग्रेस आपला गड राखणार की पंढरपूर-मंगळवेढ्या प्रमाणे भारतीय जनता पक्ष इथं धक्का देणार याकडे सर्वांच्याच नजरा आता लागल्या आहेत. Deglur-Biloli Assembly constituency by Election
हे पण वाचा, बिलोली- देगलूर पोटनिवडणुकीत ‘पंढरपूर पॅटर्न’ राबवणार; आमदार आशिष शेलार यांची ग्वाही
हे पण वाचा, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक आढावा: कशी जुळून आली नवीन सत्तेची समीकरणे?
भारतीय जनता पक्षातर्फे आता Deglur-Biloli Assembly constituency देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे दौरे वाढू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाला पंढरपूरसारखाच इथेही चमत्कार घडून येईल असे वाटत आहे आणि त्यांनी तशी तयारीही सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पोटनिवडणूक प्रभारी डॉ. भागवत कराड Bhagwat Karad यांनी शनिवारी नांदेडला मुक्कामी दौरा करत नेते मंडळी आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत मते जाणून घेतली आहेत. डॉ. कराड यांनी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर Bhaskarrao Patil Khatgaonkar यांची त्यांच्या राजेंद्रनगर येथील निवास्थानी सदिच्छा भेट घेतली आहे. Deglur-Biloli Assembly constituency by Election
हे पण वाचा, काँग्रेसने अशोक चव्हाणांकडे दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
हे पण वाचा, नाईलाजास्तव भाजपमध्ये गेलेल्या अस्वस्थ नेत्यांची घरवापसी करावी लागेल – अशोक चव्हाण
देगलूर, नायगाव, बिलोली, मुखेड आदी तालुक्यात खातगावकर यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांच्यासोबत डॉ. कराड यांनी जवळपास तास भर चर्चा केलेली आहे. खातगावकर हे तीन वेळेस आमदार आणि तीन वेळेस खासदार म्हणून याच मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांचा संपर्क हा दांडगा आहे आणि जनतेशी त्यांची विशेष नाळ जोडलेली आहे.त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांनी केलेल्या विकासकामांचा भारतीय जनता पक्षाला नक्कीच फायदा होणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटी डॉ. कराड, माजी खासदार भास्करराव पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची बैठक देखील होणार असल्याचे सांगितले गेले आहे. Deglur-Biloli Assembly constituency by Election
हे पण वाचा,
मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा! अशोक चव्हाणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भाजपाच्या निलंबित आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट, १२ चाच आकडा गाठण्यामागे नेमकं कारण काय?
मराठा आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राचाच, भाजपाकडून मराठा समाजाची दिशाभूल -नाना पटोले.
धक्काबुक्की, धमक्या देणे , शिवीगाळ करणे याला माज म्हणतात, सचिन सावंत यांची भाजपवर टीका
भाजपाच्या निलंबित आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट, १२ चाच आकडा गाठण्यामागे नेमकं कारण काय?