मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी विरोधात आघाडी तयार करण्याचं प्रयत्न सुरू केलं आहे. त्यांनी अलिकडेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आघाडी तयार करत असल्याचं म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आज सांयकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा..““निळ्या झेंड्याच्या अस्तित्वासाठी, बॅट समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा”, किशोर काशिरामांचं शेवटी मतदारांना आवाहन
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सध्या विरोधकांची एकजुठ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातच आज सांयकाळी अरविंद केजरीवाल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. या भेटीत महाराष्ट्रातील राजकारण आणि केंद्रातील राजकारणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील या बैठकीत उपस्थित असणार आहे. त्यामुळे या भेटीत ठाकरे नेमकी काय चर्चा करणार त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…“मोदींच्या विचाराने शिंदे अन् मी चालतोय, त्याच दिशेने चिंचवडचा लोकप्रतिनिधीही चालावा”, देवेंद्र फडणवीस
दरम्यान, शिवसेना आणि धनुष्यबाण हातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलचे आक्रमक झाले आहेत. काल झालेल्या रवींद्र धंगेकरांच्या सभेत त्यांनी ऑनलाईन संवाद साधत भाजपविरोधात जोरदार टिका केली. तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना घेऊन महाराष्ट्रभर दौरे करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा..““भाजपचे आक्रस्ताळे नेते फडणवीस आणि चित्रा वाघांसारखे वाचाळ कार्यकर्ते धर्माच्या नावाने पळापळ करताय”
- हेही वाचा…राणेंना बाईनं पाडलं, अजित पवारांची टोलेबाजी, त्यात राऊतांनीही तेल ओतलं, म्हणाले, कमाल की चीज..
- हेही वाचा…“काँग्रेसने एलबीटी कर आणला, तो फडणवीसांनी बंद केला”, कसब्यात चंद्रकांत पाटलांचा घणाघात
- हेही वाचा…“पोटनिवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार”, रासनेंसाठीचा मुख्यमंत्र्यांचा ‘रोड शो’ गेमचेंजर ठरणार का ?
- हेही वाचा…राजकीय पक्षांकडून फक्त स्वार्थासाठी अल्पसंख्यांकाचा वापर, आता बदल हवा, अपक्ष उमेदवार सिद्धिक शेखांचं आवाहन