मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातील चार नेत्यांना स्थान मिळाले, मात्र चर्चेत असलेल्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले नाही. यामुळे, भाजपकडून मुंडे भगिनींना सातत्याने डावललं जात आहे, असा आरोप करत मुंडे समर्थकांनी राजीनामाअस्त्र वापरले.
२३ गावांच्या विकास आराखड्याचे अधिकार PMRDA लाच; भाजपच्या कलगीतुऱ्याला राज्य सरकारचा पूर्णविराम!
यानंतर पंकजा मुंडे यांनी, नाराज कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये भेट घेऊन, त्यांच्यासोबत बैठक केली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेतल्या. “राजकारणात मी लोकांची कामं करण्यासाठी आले आहे. त्यामुळे मी किंवा प्रीतम मुंडे यांनी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवलेली नाही,” असं त्यांनी म्हटलं.
“यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षालाही मिळतात”, राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
तसेच, “मी हरले. मला संपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मी संपणार नाही. कारण तुम्ही आहात. मला सत्तेची लालसा नाही, कुठलीही अपेक्षा नाही. माझ्या राजकारणाचा पाया, माझा परिवार महाराष्ट्रात मुंडे साहेबांवर प्रेम करणारा निष्पाप कार्यकर्ता आहे. त्यामुळे, मी घर सोडणार नाही आणि मी कार्यकर्त्यांना राजीनामा देऊ देणार नाही,” असं म्हणत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामजूंर केले.
उद्धव ठाकरे : १३ राज्यांच्या सर्वेक्षणातून सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री
यावेळी त्यांनी, “माझे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा हे आहेत, कारण मी केंद्रीय नेता आहे,” असं म्हणत राज्यातील नेतृत्व आणि नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. आता पंकजा मुंडे यांच्या या भाषणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, “पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही, आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यावर खुलासा केला आहे. त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही”, असं म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.
Read Also :
- २३ गावांच्या आराखड्याच्या निर्णयाच्या बाबतीत महाविकास आघाडीची वजीर चाल ‘सक्सेसफुल’
- राष्ट्रवादीच्या बारामतीत भरणार, काँग्रेसचा ओबीसी मेळावा; नाना पटोलेंच्या भूमिकेकडे लक्ष
- महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली; ८ आमदार ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार?
- “…तर दोन महिन्यांत आघाडी सरकार हे आरक्षण पुन्हा बहाल करून दाखवेल”
- ‘‘वर्गातला एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण पहिला यायचा; असंच मुख्यमंत्र्यांचं आहे’’