मुंबई : राज्यात खासदार संजय राऊत, किरीट सोमय्या आणि नारायण राणे हा राजकीय वाद थोडासा कमी झाल्याने आता नवीनच वाद सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या स्फोटक आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर नेत्यांप्रमाणे आता इडीचा ससेमिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या मागे देखील लागला असून त्यांची सकाळपासून इडीकडून कसुन चौकशी सुरू आहे.
तारीख पे तारीख; एसटी विलिनीकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, कधी होणार फैसला…?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १९८३च्या मुंबईतील बॉम्ब स्फोटातील गुन्हेगार सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून जमीन खरेदी करण्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम मनी लॉंड्रीग प्रकरणी नवाब मलिक यांची आज सकाळपासून इडीकडून चौकशी सुरू आहे. मालमत्तेच्या व्यवहारसंबंधी मलिकांची ही चौकशी सुरू आहे.
…तर अण्णा हजारे यांना आमचा पाठिंबा असणार- मेधा पाटकर
मुंबईतील कुर्ल्यातील ३ एकर जागेशी नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांच्याकडून ३० लाखांत खरेदी तर २० लाख रूपायाचं पेमेंट केलं आहे. मलिक कुटुंबीयांच्या सॉलिडस कंपनीनं २००५ साली शहावली, सलीम पटेलांकडून व्यवहार केले असल्याचं फडणवीस म्हणाले. २००५ मध्ये कुर्ल्यातील जमीनाचा भाव २०५३ स्केअर फुट होता मात्र नवाब मलिक यांनी ती जमीन २५रूपये स्केअर फुटांनी खरेदी केली. जमीनीची पॉवर आँफ अटर्नी सलीम पटेल यांच्या नावावर आहे तर विक्री सरदार वलीच्या नावावर केली आहे मात्र कागदावर सही ही नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांनी केली आहे. मुंबईच्या हत्यारांकडून ही जमीन विकत घेण्याची काय गरज होती असा सवाल ही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेचा सभापती ५ टक्के कमिशन मागतोय; खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप
देवेंद्र फडणवीस यांचे आरोप नवाब मलिक यांनी फेटाळून लावले आहेत. नवाब मलिक म्हणाले की, मी कोणत्याही दबावाखाली कोणतेही संपत्ती घेतली नाही. भाडेकरू असल्याने त्याचे पैसे मी घेतले याचा माझा कोणत्याही अंडरवर्ल्डशी संबंध नाही.
Read also:
- हे तर शेतकऱ्यांना मातीत घालणार सरकार; एफआरपी कायद्यावरून सदाभाऊंचा सरकारवर घणाघात
- यशवंत ब्रिगेड’चा मंत्रालावर मोर्चा; येळकोट येळकोट जय मल्हार’ची घोषणाबाजी, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
- ब्रेकिंग : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ईडीच्या ताब्यात
- सात मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार; चंद्रकांत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट
- आयुक्तावरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणा यांना न्यायालयाकडून ट्रान्झिट बेल मंजूर