पुणे : महायुतीद्वारे लोकसभा निवडणुका लढविण्याची तयारी तिन्ही पक्षआंनी केली असताना मावळमध्ये मात्र महायुतीत बिघाडीची चिन्हं दिसू लागली आहे. शिवसेनेकडे असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा अशी मागणी शहाराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे. तसेच पत्र अजित पवार यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर मावळ लोकसभा मतदारसंघाबाबत काय निर्णय घेणार ? त्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलीय.
हेही वाचा…“वसंत मोरे भाऊ तुझी लढाई चालू ठेव ; तुझ्यासाठी बहिनीचे दरवाजे कायम खुले,” रूपाली पाटलांची पोस्ट व्हायरल
मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद खुप मोठी आहे. त्यामुळे गेल्या काही वेळेस अजित दादा आणि सुनील तटकरे साहेब देखील मावळ मध्ये येऊन गेले आणि त्यांच्यासमोर आम्ही मावळ लोकसभा राष्ट्रवादीला मिळावा, यासाठी मागणी केली आहे. पिंपरी,मावळ चिंचवड या तिन विधानसभा यासाठी राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. पिंपरीच राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आमदार आहेत. मावळमध्ये सुनील अण्णा शेळके म्हणून आमदार आहेत. मागच्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून चिंचवडमध्ये नाना काटे यांना एक लाखाच्या आसपास मत मिळाली होती.
घाटाखाली देखील राष्ट्रवादीची खुप चांगली आहे. आम्ही सध्या महायुती म्हणून निवडणुक लढवणार आहोत. त्यामुळे वरून जो निर्णय होईल, तो सगळ्याच कार्यकर्त्यांना मानावा लागणार आहे. यातच आमची संधी अधिक आहे. त्यामुळे भाऊसाहेब भोईर यांना संधी मिळावी अशी आमची मागणी आहे. असे अजित गव्हाणे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…मनसेने पुण्यातला हिरा गमावला..! वसंत मोरे यांचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र
पिंपरी, चिंचवड या दोन विधानसभा मतदार संघाचे आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत. तर चिंचवड विधानसभा मतदार संघात देखील मोठी ताकद असून, घाटाखालील तिन्ही विधानसभा मतदार संघातील एकूण गणित पाहता मावळची जागा आम्हालाच मिळावी अशी आग्रही मागणी आहे अशी भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेस ने घेतली असून, यामुळे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे कोंडी होऊ लागली आहे.
दरम्यान, मावळच्या जागेवर आधीच विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी दावा सांगितला आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते बाळा बेगडे यांनी देखील भाजपला हा मतदारसंघ मिळावा, यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत. तर राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर पकड मजबुत करत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.
READ ALSO :
“शिवतारेंना आवरा नाहीतर कल्याणमध्येही चित्र दिसेल”, शिंदे अन् अजित पवार गटाचे नेते एकमेकांत भिडले
हेही वाचा“आधी भ्रष्टाचारी म्हणत होते, त्यांनी मोदींना राखी बांधली”, ठाकरेंनी भावना गवळींसह भाजपचा घेतला समाचार
हेही वाचा…“शरद पवारांकडून ‘वसंत मोरें’नी मार्गदर्शन घेतलं असेल तर चुकीचे काय ?”
हेही वाचा..संभाजीनगरची जागा ठाकरे गटाकडे..! ठाकरेंकडून थेट प्रचार करण्यास सुरूवात, उद्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन
हेही वाचा…“‘मी माझ्या स्वत:च्या हातांनी परतीचे दोर कापले’” वसंत मोरे पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले