सोलापूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना आता धनगर आरक्षणासाठीही मागणी जोर धरू लागली आहे. ठिकठिकाणी आता धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करतांना दिसत आहेत. तर दुसरीकडे धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी निवेदन देण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळल्याने एकच गोंधळ उडाला आहे. दुसऱ्या बाजूला आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“कुणीही घोषणा करून मराठा आरक्षण मिळणार नाही”, पंकजा मुंडेंचा शिंदेंना जोरदार टोला
खंडोबाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा भंडारा हा श्रद्धेचं प्रतिक आहे. त्याचा आंदोलनासाठी वापर करू नये. जर काहींनी तो मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर उधळला असले तर त्याला त्यांनी आशिर्वाद समजावा. तसेच मी समस्त माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की लांडग्या काकाच्या नादाला लागू नका. असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“मराठी सणावर बंदी आणण्याचा डाव रचला गेला होता तेव्हा..,” राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत मनसेने फडणवीसांना डिवचलं
दरम्यान, भंडारा उधळणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याचठिकाणी त्याला लाथा बुक्क्यांनी पोलिसांनी तुडवलं. याचा व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावेळी शेखर बंगाळे आणि त्याचे समर्थक येळकोट येळकोट जय मल्हारा आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी विखे पाटील यांनी अरे सोडून द्या त्याला. मारू नका, असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी बंगाळे याला बाहेर ओढत नेलं. पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच. भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको. धनगर आरक्षणा संदर्भातील कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील! असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय.
खंडोबाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा भंडारा हा श्रद्धेचं प्रतिक आहे.त्याचा आंदोलनासाठी वापर करू नये.जर काहींनी तो मा.@RVikhePatil यांच्यावर उधळला असेल तर त्याला त्यांनी आशिर्वाद समजावा.तसेच मी समस्त माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की लांडग्या ‘काका’च्या नादाला लागू नका.
जय मल्हार… pic.twitter.com/9Q18nvtTDN— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…भंडारा उधळला, पोलिसांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, विखे पाटील म्हणाले, “भंडारा उधळणाऱ्यांवर.., “
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला अर्ध्या रस्त्यातच गाडीतून खाली उतरवलं, अन् हातपाय तोडण्याची दिली धमकी
हेही वाचा…“खोके पॅटर्न आता सरकारी नोकर भरतीमध्येही सुरू,” वडेट्टीवारांचा ट्रीपल इंजिन सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“धनगर आरक्षण तापलं, आंदोलनकांनी मंत्र्यांवर भंडारा उधळला, पोलिसांची लाथाबुक्क्याने जोरदार मारहाण”
हेही वाचा…सरकारचा जीआर घेऊन शिष्टमंडळ पोहचले, पण जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम