मुंबई : वेदांता फॉक्सकॉनचा पुण्यात होऊ घातलेला प्रकल्प अचानक गुजरातला स्थलांतरीत होत असल्याचं वृत्त मंगळवारी समोर आलं. वेदांत आणि फॉक्सकॉनच्या सेमी कंडक्ट हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं आहे.
“पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा
जितेंद्र आव्हाडांनी आपल्या कवितेच्या चालीवर शिंदे सरकारला फटकारलं आहे. ते म्हणाले की, ठेवू नका महाराष्ट्रा गुजरातला गहाण, तुम्हाला छत्रपती शिवरायांची आन, दाखवा थो़डी तरी अस्मिता, थोडा तरी स्वाभिमान, आज मात्र झुकली महाराष्ट्राची मान. तुडवू नका पायदळी महाराष्ट्राच्या मातीची शान, तुम्हाला शिवरायांची आन. असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला देण्यावाचून रोखून ठेवा. असं त्यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कल्याणासाठी सुरतेवर स्वारी करून खजिना महाराष्ट्रात आणला होता. आणि आताचे राज्यातील शासक इथे होऊ घातलेला एवढा मोठा प्रोजक्ट आणि महसुल गुजरातला देऊन आले. फरक स्पष्ट व्हावा एवढाच शुद्ध हेतू. असं म्हणत त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारवर शंका उपस्थित केली आहे.
“शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”
सोबतच, गेल्या दोन वर्षात वेदांत फॉक्सकॉन कंपनीला तत्कालीन सरकारकडून जसा प्रतिसाद मिळायला हवा होता, तसा तो कदाचित मिळाला नसेल, म्हणून कंपनीकडून हा निर्णय घेतला असावा. इतकेच नव्हे तर हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्न करत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Read also
- सांगलीत सांधुंना मारहाण; राजकारण तापलं, भाजप-काॅंग्रेस आमनेसामने
- शिंदेंच्या बंडखोरीनंतर मोठा राजकीय भुंकप..! माजी मुख्यमंत्र्यांसह काॅंग्रेसचे 8 आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश
- “राज्यात उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही?”; राज ठाकरेंनी शिंदे सरकारला फटकारलं
- संजय शिरसाठांना पुन्हा एकदा डावललं..! शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर
- “हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्ये व्यस्त, विरोधकही काही बोलत नाहीत”; राजू शेट्टी आक्रमक