IMPIMP

नागपूरातील डॉ. अविनाश पोफली यांचे ‘त्या’ तरूणावर दबावतंत्र; भेट घेण्यासही दिला नकार

नागपूर : नागपूरातील इंजिनियअरींग करणाऱ्या तरूणाला पायाच्या गुडाघ्यात त्रास होवू लागल्याने त्याने नागपूरच्या सेंट्रल इंडिया इंन्स्टीट्यूट ऑफ हेमॉक्लॉजी ॲन्ड ऑनक्लॉलॉजी रुग्णालयात तब्बल दीड वर्षे उपचार घेतले. परंतू, डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे सुमित तिवारी या ३० वर्षीय तरूणाचा पाय निकम्मा झाला. त्यामुळे, या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी तिवारी डॉक्टरांची भेट घेण्यास इच्छुक होता. परंतू, डॉ. अविनाश पोफली यांनी सर्रास नकार दिल्या आहे. शिवाय, तुला काय करायचे ते कर आपण आता कोर्टातच भेटू, अशा खाक्या सोडत तिवारी यांच्यावर दबावतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

नागपूरातील डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे तरूणाचा पाय निकम्मा; डॉ. अविनाश पोफली यांच्यावर कारवाई होणार?

सुमित तिवारी यांना नागपूरच्या सेंट्रल इंडिया इंन्स्टीट्यूट ऑफ हेमॉक्लॉजी ॲन्ड ऑनक्लॉलॉजी रुग्णालयात उपचार घेतले. परंतू, कोणताही फरक जाणवत नसल्याने त्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात धाव घेतली. एम्स रुग्णालयातील विविध चाचण्यादरम्यान, नागपूरातील डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे पायाला अधिकचा त्रास वाढला असल्याचे एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले. अधिकचा त्रास वाढल्याने तरुणाला उठता बसला देखिल येत नाही. त्यामुळे, मी कसे जगाचये?, माझ्या आयुष्याचे काय होणार?, डॉक्टर माझ्यासोबत असं का केलं?, मी पुर्ण लंगडा झालो आहे?, काहीतरी करा, माझ्यावर उपचार करा, कमीत कमी मला भेटा तरी?, अशी आर्तहाक तिवारी देवू लागला आहे. परंतू, डॉ. अविनाश पोफली यांनी भेट घेण्यास सर्सारपणे नकार दिला आहे. तुला जे करायचे ते करं, आपण आता कोर्टातच भेटू, मला काही फरक पडत नाही, असे सांगत तरूणावर दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

शरद पवार आणि अमित शहा यांच्यातल्या भेटीचा उलघडा, मात्र ‘त्या’ १५ मिनिटांच्या भेटीत काय झालं? 

तिवारी हे अविनाश पोफली यांची भेट घेण्यासाठी विनवनी करत होते. मात्र, डॉ. अविनाश पोफली हे तु चुकीचा मार्ग निवडत आहेस. तुला जे करायचे ते करं, आपण आता कोर्टात भेटू, आणि कोर्टातच्या निर्णयात माझाच विजय होणार, मीच जिंकणार, असा आत्मविश्वासही पोफली यांनी दाखवला आहे. त्यामुळे, रुग्णांसोबत हालगर्जीपणा करायचा आणि पुन्हा म्हणायचं, मीच जिंकणार, एवढा आत्मविश्वास अशा डॉक्टरांना येतो तरी कुठून?, हालगर्जीपणामुळे कित्येक रुग्णांच्या आयुष्याचे वाटेळे करणाऱ्या राज्यातील विविध डॉक्टरांना लगाम बसणे गरजेचे आहे. त्यामुळे, असा डॉक्टरांची दखल राज्याचे गृहमंत्री आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Also :